Sonnalli Seygall Baby Saam Tv
मनोरंजन बातम्या

Sonnalli Seygall Baby: 35 व्या वर्षी प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री बनली आई; दिला गोंडस बाळाला जन्म

Sonnalli Seygall Welcome New Baby Girl: सोनालीने गोंडस मुलीला जन्म दिला आहे. सोनालीच्या पतीने याबाबतची माहिती चाहत्यासोबत शेअर केली आहे.

Manasvi Choudhary

टिव्ही अभिनेत्री सोनाली सेहगलने नुकतच गुडन्यूज तिच्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे. वयाच्या ३५ व्या वर्षी सोनाली आई झाली आहे. सोनालीने गोंडस मुलीला जन्म दिला आहे. सोनालीच्या पतीने याबाबतची माहिती चाहत्यासोबत शेअर केली आहे.

सोशल मीडियावर आशीषने एक व्हिडीओ पोस्ट शेअर केली आहे. या व्हिडीओमध्ये आशीष खूपच आनंदी झालेला दिसत आहे. बाबा झाल्यानंतरचं आशीषच्या चेहऱ्यावर हसू उमललं आहे. हॉस्पीटलच्या कपड्यांमध्ये तो नाचताना दिसतोय. त्याने तोंडाला मास्क लावला आहे. खास काळजी घेत त्यांनी बाळाचे स्वागत केले आहे.

सोनालीने जवळपास पाच वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर दीड वर्षापूर्वी बिझनेसमन आशीष सजनानीसोबत लग्नगाठ बांधली. यानंतर आता सोनाली आणि आशीष दोघेही आई- बाबा झाले आहेत. सोशल मीडियावर आशीषच्या पोस्टवर अनेकांनी शुभेच्छाचा वर्षाव केला आहे.

सोनालीच्या कामाबद्दल बोलायचं तर, सोनालीने २०११ मध्ये लव रंजन दिग्दर्शित 'प्यार का पंचनामा' या चित्रपटातून इंडस्ट्रीत पदार्पण केले. यानंतर सोनाली अनेक मालिका शोमध्ये दिसली. सोनालीने सोनू की टीटू की स्वीटी, हाय जॅक, जय मम्मी दी या चित्रपटात अभिनय केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यातील नवले ब्रिजजवळ दोन कार आणि ट्रकचा भीषण अपघात

Rice Papad Recipe: जेवणासोबत काहीतरी चटपटीत खायचय? घरीच बनवा कुरकुरीत तांदळाचे पापड

Crime : नागपूर हादरले! २३ वर्षीय 'रील स्टार' रिंकीची हत्या, मेकॅनिक नवऱ्याने डोकं फोडलं

Phaltan Doctor Case: ...अन् सगळ्या सुंदर स्वप्नांचा चुराडा झाला, डॉक्टर आत्महत्या प्रकरणावर किरण मानेंनी सरकारला धरले धारेवर

Shocking : पनवेल हादरलं! मॅनेजरनं बाथरूममध्ये स्पाय कॅमेरा लावला, महिलांचे प्रायव्हेट क्षण कैद केले अन्...

SCROLL FOR NEXT