Allu Arjun SAAM TV
मनोरंजन बातम्या

Pushpa 2 Actor News: पुष्पा चित्रपटाचा स्टार अभिनेता अडचणीत! महिलेने केले लैंगिक शोषणाचे आरोप

Pushpa Actor Shri Tej Booked for Cheating Women: पुष्पा चित्रपटाचा स्टार अभिनेत्यावर पिडीत महिलेने गंभीर आरोप केले आहेत.

Ankush Dhavre

प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता, पुष्पा चित्रपट फेम श्रीतेज सध्या तुफान चर्चेत आहे. एका महिलेने श्रीतेजवर शारीरिक आणि आर्थिक शोषण केल्याचे आरोप केले आहेत. पिडीत महिलेने केलेल्या आरोपांनंतर श्रीतेजवर आयपीसी कलम ६९, ११५(२) आणि ३१८ (२) नुसार एफआयआर दाखल करण्यात आलं आहे.

लग्नाचं आमिष दाखवून केली फसवणूक

पिडीत महिलेने दाखल केलेल्या एफआयआरनुसार, अभिनेता श्रीतेजने लग्न करणार असल्याचं वचन दिलं होतं. त्यामुळे दोघांच्या नातं पुढं गेलं. त्यानंतर तिचं भावनिक, आर्थिक आण शारीरिक शोषण करण्यात आलं.

दोघे रिलेशनशिपमध्ये असताना, आरोपीने पिडीत महिलेकडून २० लाख रुपये उकळले असल्याचं एफआयआरमध्ये म्हटलं गेलं आहे. यासह रिलेशनशिप सुरु असताना, आरोपीचे दुसऱ्या महिलेसोबत संबंध होते आणि त्यांचा ७ वर्षांचा मुलगा आहे, असा आरोप पिडीत महिलेने केला आहे.

पिडीत महिलेने यापूर्वी एप्रिल २०२४ मध्येही आरोपीविरोधात तक्रार केली होती.मात्र कुटुंबाकडून आश्वासन मिळाल्यानंतर तिने तक्रार मागे घेण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान हे प्रकरण सुरु असताना, अर्चनाच्या पतीला हे प्रकरण समजलं.

त्यावेळी त्याला जबर धक्का बसला. या जबर धक्क्यामुळे त्याच्या मृत्यू झाला. यापूर्वी पिडीत महिलेने माधापूर पोलीस स्थानकातही तक्रार दाखल केली होती. मात्र या तक्रारीनंतर काहीच कारवाई करण्यात आली नव्हती.

केरळ सरकारने उचललं पाऊल

दाक्षिणात्य चित्रपट इंडस्ट्रीमध्ये गेल्या काही महिन्यांपासून लैंगिक शोषण केल्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाल्याचे पाहायला मिळाले आहे. पिडीतांनी केलेल्या तक्रारी लक्षात घेता, केरळ सरकारने एक समिती स्थापन केली. या समितीचं नाव एसआयची असं ठेवण्यात आलं. लैंगिक शोषण केल्याचा आरोपात मल्याळम चित्रपटसृष्टीतील दोन बड्या अभिनेत्यांना राजीनामा द्यावा लागला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, बड्या नेत्यांसह ८०० कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

Pune Crime News : दिवसा खासगी बँकेत नोकरी, रात्री करायचा भयंकर खेळ; पुण्यातील तरुणासह ३९ जण अडकले

Diabetes: डायबिटीज कंट्रोल होत नाहीये? या गोष्टीची कमी वाढवू शकतं टेन्शन

सरकारकडून लाडक्या बहिणींना दसरा-दिवाळीचं मोठं गिफ्ट; बँक खात्यात पाठवले 10 हजार रुपये|VIDEO

Friday Tips: शुक्रवारी हे पदार्थ खाण टाळा, अन्यथा...

SCROLL FOR NEXT