Pushpa 3 SAAM TV
मनोरंजन बातम्या

Pushpa 3 : पुष्पाचा तिसरा भाग येणार; पोस्टर लीक, अल्लू अर्जुन नव्हे तर 'हा' अभिनेता दिसणार मुख्य भूमिकेत?

Pushpa 3 Poster: 'पुष्पा 2' रिलीज होण्याआधीच 'पुष्पा 3'ची चर्चा रंगली आहे. या चित्रपटात 'हा' साऊथ अभिनेता दिसणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Shreya Maskar

बहुप्रतीक्षित 'पुष्पा 2' चित्रपट 5 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाने रिलीज आधीच रेकॉर्ड ब्रेक कामगिरी केली आहे.'पुष्पा 2'ने ॲडव्हान्स बुकिंगमध्ये तब्बल 100 कोटी रुपयांची कमाई केली आहे. या रुपयांत सतत वाढ होताना पाहायला मिळत आहे.

'पुष्पा 2' रिलीज होण्याआधीच सर्वत्र 'पुष्पा 3' ची चर्चा रंगली आहे. 'पुष्पा 3' (Pushpa 3) चित्रपटाचे एक पोस्टर सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल होणाऱ्या पोस्टरमध्ये चित्रपटाचे नाव 'पुष्पा ३: द रॅम्पेज' असे दिसत आहे. यामुळे चाहते खूपच खुश झाले आहेत.

व्हायरल होणाऱ्या पोस्टर चित्रपट समीक्षक मनोबाला विजयबालन यांनी आपल्या एक्स हँडलवर टाकले आहे. त्यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये ऑस्कर विजेते साउंड डिझायनर रेसुल पुकुट्टी आणि काही लोक 'पुष्पा ३' लिहिलेल्या पोस्टर समोर उभे आहेत.

विजय देवरकोंडाने 2022मध्ये 'पुष्पा'चे दिग्दर्शक सुकुमार यांच्या वाढदिवशी एक फोटो शेअर केला होता. ज्यात 'पुष्पा 3' चा उल्लेख करण्यात आला होता. अभिनेत्याने कॅप्शनमध्ये लिहिलं होत की, "द राइज, द रुल, द रॅम्पेज..." त्यामुळे आता सोशल मीडियावर 'पुष्पा 3' चित्रपटात साउथ स्टार विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) खलनायकाच्या भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा पाहायला मिळत आहे. तसेच तो अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) मुलाच्या भूमिकेत दिसू शकते असे देखील बोले जात आहे. मात्र अद्याप कुठेही याची अधिकृत घोषणा करण्यात आली नाही आहे.

'पुष्पा 2'साठी प्रेक्षकांची उत्सुकता वाढत जात आहे. हा चित्रपट हिंदी, तेलगू, तामिळ, कन्नड आणि मल्याळमसह अनेक भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check : SIR चा फॉर्म भरल्यावर मिळणार १६ हजार रुपये? व्हायरल पोस्टमागचं सत्य काय?

Coriander Storage: फ्रिजमध्ये कोथिंबीर लगेच काळी पडते? मग या ट्रिक्स वापरा 10 दिवस फ्रेश राहील

Maharashtra News Live Update: चंद्रपूर- मनपा आमसभेच्या कोरमवरून महापौर नगरसेवकांमध्ये आरोप प्रत्यारोप

श्रावण कधीपासून सुरु होणार? जाणून घ्या तारीख आणि धार्मिक महत्त्व

Health Care : सतत थकल्यासारखे वाटते का? ' ही' ५ गंभीर लक्षणे फॅटी लिव्हरची असू शकतात, वेळीच ओळखा

SCROLL FOR NEXT