Allu Arjun SAAM TV
मनोरंजन बातम्या

Allu Arjun : अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2' वादाच्या भोवऱ्यात; हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप, नेमकं कारण काय?

Pushpa 2 Controversy: अल्लू अर्जुनचा आगामी 'पुष्पा 2: द रुल' हा चित्रपटाला रिलीजच्या आधीच बॅन करण्याची मागणी करण्यात आली आहे. या चित्रपटामुळे लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला आहे.

Shreya Maskar

सध्या सर्वत्र अल्लू अर्जुनची (Allu Arjun) चर्चा पाहायला मिळत आहे. कारण अल्लू अर्जुनचा बहुप्रतीक्षित चित्रपट 'पुष्पा 2: द रुल' (Pushpa 2) रिलीज आधीच वादाच्या भोवऱ्यात आला आहे. या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली जात आहे. हरियाणामधील लोकांनी 'पुष्पा 2: द रुल' या चित्रपटातील काही दृश्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, हरियाणातील हिसार गावातील काही लोकांनी 'पुष्पा 2: द रुल'या चित्रपटावर आक्षेप घेतला आहे. हिसार गावातील काही लोकांनी गावातील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. हिसार येथील कुलदीप कुमार यांनी ही तक्रार दाखल केली आहे. यांनी त्यात हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप केला आहे.

पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करताना कुलदीप कुमारने सांगितले की, 'पुष्पा 2: द रुल'च्या ट्रेलरमध्ये अल्लू अर्जुनला अर्धनारीश्वरच्या भूमिकेत दाखवण्यात आला आहे. त्यात माँ कालीचे चित्रही दिसते. त्यांच्या मते या दृश्यामुळे धार्मिक भावनाही दुखावल्या जात आहेत. पैशांसाठी धर्माला दुखावून अपमान करण्याचा प्रयत्न केला जात आहे. माँ काली आणि अल्लू अर्जुनच्या अर्धनारीश्वरचा सीन चित्रपटातून काढून टाकण्याची मागणी त्यांनी केली आहे. असे न केल्यास हरियाणात हा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही असे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. मात्र अद्यापही पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला नाही.

'पुष्पा 2: द रुल' हा चित्रपट ५ डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात अल्लू अर्जुनसोबत रश्मिका मंदान्ना मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर १७ नोव्हेंबरला पाटणा येथे लाँच करण्यात आला. या चित्रपटाच्या ट्रेलर पाहून काही प्रेक्षकांच्या मनात चित्रपटासाठी उत्सुकता लागली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local Viral Video :बोंबिल मासा खाताय? वेळीच सावध व्हा! माश्याला लाल कलर लावतानाचा व्हिडिओ होतोय VIRAL

Fact Check: रेल्वेत रिक्षा टाकून भैय्ये पळाले? मराठी बोलता येत नसल्याने भैय्ये घाबरले?

Maharashtra News Live Update: धनुष्यबाण एकनाथ शिंदेंचाच! कोणी काहीही बोलले तरी फरक पडत नाही; आमदार आमश्या पाडवी यांचा दावा

मंत्र्यांची जरांगेंशी चर्चा निष्फळ, जरांगे आंदोलनावर ठाम, सरकारला धास्ती

FDA ची राज्यभर धडक कारवाई; मुंबई क्रिकेट क्लबसह ११ ठिकाणाचे परवाने निलंबित

SCROLL FOR NEXT