Pushpa 2 Saam Tv
मनोरंजन बातम्या

'Pushpa 2' The Rule: 'पुष्पा 2' लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला, सेटवरील फोटो व्हायरल

सिनेमॅटोग्राफर मिरोस्लाव कुबा ब्रोझेक यांनी 'पुष्पा 2' चित्रपटाच्या सेटवरील एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

'Pushpa 2' The Rule Movie Update: अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा' चित्रपटाची क्रेज अजूनही कमी झालेली नाही. मात्र असे असूनही 'पुष्पा 2'च्या चित्रीकरणाला अल्लू अर्जुनने खूप उशिर केला असल्याच्या चर्चा सुरू आहेत. सिनेमॅटोग्राफर मिरोस्लाव कुबा ब्रोझेक यांनी नुकताच त्यांच्या आगामी चित्रपटाच्या सेटवरील एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या पोस्टाच्या माध्यमातून त्यांनी चाहत्यांना 'पुष्पा 2'ची बातमी दिली. रविवारी, मिरोस्लाव यांनी अल्लू अर्जुनसोबतचा एक फोटो पोस्ट केला आहे, फोटोमध्ये ते टॉलिवूड स्टारला काही सूचना देताना दिसत आहेत.

फोटोमध्ये अल्लू अर्जुन एक इंटेन्स लूक देताना दिसत आहेत. पांढरा टी-शर्ट, सेट केलेले केस आणि वाढलेली दाढी असा अल्लू अर्जुनाचा लुक या पोस्टमध्ये दिसत आहे. 'उत्कंठा वाढवणारा प्रवास सुरू झाला आहे.… आयकॉन स्टार पुष्पा चित्रपटातील अल्लू अर्जुनचे आभार,' असे कॅप्शन मिरोस्लाव कुबा ब्रोझेक यांनी त्यांच्या इंस्टाग्राम पोस्टला दिले आहे. (Allu Arjun)

'पुष्पा 2'च्या सेटवरील अभिनेता-सिनेमॅटोग्राफर जोडीचा आणखी एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अल्लू अर्जुनच्या एका फॅन पेजने ट्विटरवर अभिनेत्याच्या नवीन फोटोशूटमधील एक फोटो पोस्ट केला आहे. व्हायरल ट्विटमध्ये असे लिहिले आहे की, '#पुष्पद नियम ~ आकाश हीच मर्यादा आहे! आयकॉन स्टार अल्लू अर्जुन आणि सिनेमॅटोग्राफर कुबा'. (Social Media)

सुकुमार लिखित आणि दिग्दर्शित, 'पुष्पा: द रुल' या चित्रपटात अल्लू अर्जुन, रश्मिका मंदान्ना आणि फहाद फासिल प्रमुख भूमिकेत आहेत. ब्लॉकबस्टर अॅक्शन थ्रिलर चित्रपटाचा दुसरा भाग पुष्पराज (अल्लू अर्जुन) आणि भंवर सिंग शेखावत (फहाद फासिल) यांच्यावर केंद्रित असणार आहे.

'पुष्पा: द रुल' डिसेंबर 2022मध्ये थिएटरमध्ये दाखल होईल अशी घोषणा यापूर्वी करण्यात आली होती. सुकुमार दिग्दर्शित या चित्रपटाचे शूटिंग काही कारणांमुळे पुढे ढकलण्यात आले होते. अल्लू अर्जुन स्टारर हा चित्रपट 2024 मध्ये प्रदर्शित करण्यावर निर्मात्यांचे लक्ष आहे. (Movie)

पुष्पा चित्रपटाच्या दुसऱ्या भागात फहाद फासिलच्या जागी अर्जुन भंवर सिंग शेखावतची भूमिका साकारणार असल्याचे म्हटले आजच्या होते. परंतु चित्रपटाचे निर्माते नवीन येमानी यांनी अलीकडेच दिलेल्या मुलाखतीत सर्व अफवा खोडून काढल्या आहेत. ते म्हणले की, 'नाही, ही बातमी चुकीची आहे. फहाद फासिलच ही भूमिका करत आहे. त्यामुळे ही बातमी शंभर टक्के खोटी आहे."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

हनी ट्रॅपची इनसाईड स्टोरी, हनी ट्रॅपसाठी महिलेने कसा रचला सापळा?

Kolhapur News: 'महादेवी'साठी ग्रामस्थ आक्रमक, वनतारामध्ये 'महादेवी'ला नेण्यास विरोध

EVM Recounting: 8 महिन्यानंतर खडकवासल्यात फेरमतमोजणी, VVPAT मधील व्होटर स्लिप गहाळ ?

Crime News: मुंबईच्या २४ वर्षीय महिलेवर दुबईत सामूहिक बलात्कार; ५ सहकाऱ्यांच्या वासनेची बळी पडली

Maharashtra Politics: फडणवीस करणार मंत्रिमंडळाची साफसफाई, मंत्रिमंडळात फेरबदल, 8 विकेट पडणार?

SCROLL FOR NEXT