Pushpa 2 Box Office Collection Day 10 SAAM TV
मनोरंजन बातम्या

Pushpa 2 Box Office Collection Day 10: पुष्पा भाऊचा बॉक्स ऑफिसवर जलवा, वीकेंडला कमाई किती?

Pushpa 2 Collection : साऊथ अभिनेता अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2' चित्रपटाची दिवसेंदिवस कमाई वाढत जात आहे. या चित्रपटाने अनेक मोठ्या बॉलिवूड चित्रपटांना मागे टाकले आहे. या चित्रपटाचे वीकेंड कलेक्शन जाणून घेऊयात.

Shreya Maskar

साऊथ अभिनेता अल्लू अर्जुनचा (Allu Arjun) चित्रपट 'पुष्पा 2: द रुल' (Pushpa 2) याची सर्वत्र हवा पाहायला मिळत आहे. या चित्रपट बंपर कमाई करत आहे. दिवसेंदिवस कमाईच्या आकड्यात वाढ होताना पाहायला मिळत आहे.'पुष्पा 2 ' मधील रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna ) आणि अल्लू अर्जुन यांची केमिस्ट्री चाहत्यांना खूप आवडली आहे. 'पुष्पा 2 ' मध्ये जबरदस्त ॲक्शन पाहायला मिळत आहे.

'पुष्पा 2: द रुल' हा चित्रपट सुकुमार दिग्दर्शित आहे. हा चित्रपट पाच भाषांमध्ये रिलीज झाला आहे. तमिळ, तेलुगु, कन्नड, हिंदी आणि मल्याळम या भाषांचा समावेश आहे. या चित्रपटाने जगभरात कोटींचा गल्ला जमवला आहे. 'पुष्पा 2: द रुल' चित्रपटाचे 10 व्या दिवसाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन जाणून घेऊयात.

'पुष्पा 2' बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 10

  • पहिला दिवस - 164.25 कोटी

  • दुसरा दिवस - 93.8 कोटी

  • तिसरा दिवस - 119.25 कोटी

  • चौथा दिवस - 141.5 कोटी

  • पाचवा दिवस - 65.1 कोटी

  • सहावा दिवस - 52.50 कोटी

  • सातवा दिवस - 42 कोटी

  • आठवा दिवस - 37.95 कोटी

  • नववा दिवस - 36.40 कोटी

  • दहावा दिवस - 62.3 कोटी

  • पेड प्रिव्ह्यूज - 10.65 कोटी

'पुष्पा 2' जगभरातील कलेक्शन

आतापर्यंत 'पुष्पा 2' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 800 कोटींचा टप्पा पार केला आहे. 10 दिवसांत एकूण 824.5 कोटी रुपये कमावले आहेत. 'पुष्पा 2: द रुल'ने जगभरात 1190 कोटी रुपयांची बंपर कमाई केली आहे. या आकड्यात सतत वाढ होताना पाहायला मिळत आहे. या चित्रपटाची गाणी खूप सुपरहिट झाली आहेत. या चित्रपटाचे वीकेंड बंपर कमाई केली आहे.

'पुष्पा 2: द रुल' चित्रपट 5 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाने रिलीजच्या पहिल्या दिवसापासूनच बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करायला सुरुवात केली. 'पुष्पा 2'ने ॲनिमल, बाहुबली, जवान आणि स्त्री 2 सारख्या अनेक मोठ्या चित्रपटांना मागे टाकले आहेत. 'पुष्पा 2: द रुल' चित्रपट रेकॉर्ड ब्रेक कामगिरी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Solapur Fort : भक्कम दुहेरी तटबंदी अन् वैभवशाली इतिहास, सोलापूरमध्ये तलावाच्या काठी वसलाय भव्य किल्ला

Maharashtra News Live Update: विदर्भाचा मुख्यमंत्री असूनही शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ का? आमदार बच्चू कडूंचा सवाल

Accident: समृद्धी महामार्गावर भयंकर अपघात; पुण्याहून नागपूरला जाणाऱ्या बसचा चेंदामेंदा, प्रवासी बसमध्येच अडकले

Deool Band 2 Collection : स्वामी भक्तीत प्रेक्षक तल्लीन! प्रवीण तरडेंच्या 'देऊळ बंद २'चं बॉक्स ऑफिसवर वर्चस्व, वाचा संडे कलेक्शन

Chanakya Niti: या ५ कारणांमुळे नवरा बायकोत होतात वाद, वेळीच घ्या योग्य निर्णय अन्यथा...

SCROLL FOR NEXT