Pushpa 2 Box Office Collection Day 5 SAAM TV
मनोरंजन बातम्या

Pushpa 2 Box Office Collection Day 5: बॉक्स ऑफिसवर 'पुष्पा'चा डंका, छप्परफाड कमाईचा आकडा किती?

Pushpa 2 Collection : 'पुष्पा 2'च्या बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये दिवसेंदिवस वाढ होत जात आहे. रिलीजच्या पाच दिवसात चित्रपटाने छप्परफाड कमाई केली आहे. एकूण कलेक्शन किती, जाणून घ्या.

Shreya Maskar

साऊथ अभिनेता अल्लू अर्जुनचा (Allu Arjun ) चित्रपट 'पुष्पा 2: द रुल' (Pushpa 2 ) हा सध्या सर्वत्र चांगलाच गाजत आहे. या चित्रपटाने छप्परफाड कमाई केली आहे. हा चित्रपट आता लवकरच 600 कोटींचा टप्पा पार करणार आहे. 'पुष्पा 2: द रुल' हा चित्रपट 5 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला आला.

'पुष्पा 2' ऑफिस कलेक्शन दिवस 5

'पुष्पा 2' चित्रपट सुकुमार दिग्दर्शित आहे. पुष्पाची क्रेझ वाढतच जात आहे. मीडिया रिपोर्टनुसार, 'पुष्पा 2' ने पहिल्या दिवशी 164.25 कोटी रुपये कमावले. दुसऱ्या दिवशी 93.8 कोटी आणि तिसऱ्या दिवशी 119.25 कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाने रविवारी 141.5 कोटींची बंपर कमाई केली आहे. तसेच पेड प्रिव्ह्यूजमध्ये 10.65 कोटी रुपये कमावले. काल सोमवारी चित्रपटाच्या पाचव्या दिवशी (Pushpa 2 Box Office Collection Day 5) 'पुष्पा 2'ने 65.1 कोटी रुपये कमावले आहेत. 'पुष्पा 2: द रुल'ची पाच दिवसांची एकूण कमाई आता 594.1 कोटींवर पोहोचली आहे.

'पुष्पा 2' चित्रपटाने तेलगूमध्ये 211.7 कोटी रुपये, हिंदीमध्ये 332.7 कोटी रुपये, तामिळमध्ये 34.45 कोटी रुपये, कन्नडमध्ये 4.05 कोटी रुपये आणि मल्याळममध्ये 11.2 कोटी रुपये कमावले आहेत.

'पुष्पा 2' बॉलिवूडमधील अनेक मोठ्या चित्रपटांना मागे टाकले आहे. यात रणबीर कपूरच्या ॲनिमलचा देखील समावेश आहे. तसेच शाहरुख खानच्या 'पठाण' चित्रपटाचा देखील समावेश आहे. 2021 मध्ये 'पुष्पा द राइज' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाने देखील बॉक्स ऑफिसवर बंपर कमाई केली होती.

'पुष्पा 2: द रुल' हा चित्रपट तेलुगू, तमिळ, हिंदी, मल्याळम आणि कन्नड या पाच भाषांमध्ये रिलीज झाला आहे. चित्रपटातील साऊथ अभिनेता अल्लू अर्जुन आणि अभिनेत्री रश्मिका मंदानाची (Rashmika Mandanna ) केमिस्ट्री चाहत्यांना खूप आवडली आहे.'पुष्पा 2' मध्ये जबरदस्त ॲक्शन दाखवली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Kisan Yojana : पीएम किसानचा 24वा हप्ता कधी येणार? ऑक्टोबरमध्ये खात्यात जमा होणार ₹2,000? जाणून घ्या मोठी अपडेट

Maharashtra News Live Update: शालार्थ आयडी घोटाळाप्रकरणी जळगावात नाशिकच्या विशेष पथकांची धडक

Sugar Price: मोठी बातमी! साखरेचे भाव १०० पार जाणार? सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना बसणार झटका

New Rules India : आजपासून १० नवे बदल, LPG सिलेंडरपासून बँकिंगपर्यंत नियम बदलले; तुमच्यावर काय परिणाम होणार? जाणून घ्या

EPFO चा मोठा निर्णय! PF Trustsना मिळणार मोठी संधी, जाणून घ्या संपूर्ण माहिती

SCROLL FOR NEXT