Pushpa 2 Collection SAAM TV
मनोरंजन बातम्या

Pushpa 2 Collection : 'झुकेगा नही साला...' पुष्पा भाऊची क्रेझ कायम, तिसऱ्या मंगळवारी कमावले 'इतके' कोटी

Pushpa 2 Box Office Collection Day 20 : 'पुष्पा 2'च्या कलेक्शन आकड्यामध्ये पुन्हा वाढ झालेली पाहायला मिळत आहे. साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या चित्रपटाने रिलीजच्या तिसऱ्या मंगळवारी देखील बंपर कमाई केली आहे.

Shreya Maskar

साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2' (Pushpa 2) चित्रपट 5 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाने खूप कमी वेळात उंच भरारी घेतली आहे. या चित्रपटातील अल्लू अर्जुन (Allu Arjun) आणि रश्मिका मंदाना ( Rashmika Mandanna) यांची केमिस्ट्रीने चाहत्यांना भुरळ घातली आहे. 'पुष्पा 2' चित्रपट सुकुमार दिग्दर्शित आहे. या चित्रपटातील गाण्याने तर सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. 'पुष्पा 2' चित्रपटाचे आतापर्यंतचे कलेक्शन जाणून घेऊयात.

'पुष्पा 2' बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 20

मीडिया रिपोर्टनुसार, 'पुष्पा 2' चित्रपटाने रिलीजच्या पहिल्या आठवड्यात 725.8 कोटी रुपयांची कमाई केली. दुसऱ्या आठवड्यात 264.8 कोटी रुपये कमावले. पुष्पा 2' चित्रपटाने जगभरात 1500 कोटींहून अधिक कमाई केली आहे. 'पुष्पा 2' चित्रपटाने 19व्या दिवशी 12.25 कोटी रुपयांची कमाई केली आहे. अखेर तिसऱ्या आठवड्याच्या शेवटी 'पुष्पा 2' चित्रपट भारतातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.

चित्रपटाने तिसऱ्या रविवारी 33.25 कोटी रुपये कमावले आहेत. 'पुष्पा 2' चित्रपटाने 'बाहुबली 2' चित्रपटाचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे. 'पुष्पा 2' चित्रपटाने तिसऱ्या सोमवारी 13 कोटी रुपयांची कमाई केली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, 'पुष्पा 2'ने तिसऱ्या मंगळवारी म्हणजे विसाव्या दिवशी 14.25 कोटी रुपये कमावले आहेत. चित्रपटाचे 20 दिवसांचे एकूण कलेक्शन 1089 कोटी रुपये झाले आहे.

'पुष्पा 2' चित्रपट पाच भाषांमध्ये रिलीज झाला आहे. यात तेलुगु, हिंदी, तामिळ, कन्नड आणि मल्याळम या भाषांचा समावेश आहे. या चित्रपटाने पाचही भाषेत बंपर कमाई केली आहे. चित्रपटाने तेलुगूमध्ये 312.05 कोटी रुपये, हिंदीमध्ये 701.65 कोटी रुपये, तामिळमध्ये 54.65 कोटी रुपये, कन्नडमध्ये 7.44 कोटी रुपये आणि मल्याळममध्ये 14.06 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

चिमुकल्यांच्या पोषण आहाराचा पर्दाफाश; सेविकेवर कारवाई, आता प्रशासनाने घेतला मोठा निर्णय!

पाण्याचा प्रश्न सुटणार? 140 एकरांसाठी ब्रिजस्टोन इंडियाची मोठी घोषणा! नेमका काय आहे प्रोजेक्ट?

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची भाजपविरोधात आक्रमक भूमिका

Sambhajinagar: आत्महत्या करणाऱ्या तरुणाला वाचवायला गेले, डोंगरावरून पडून आई-वडील अन् मुलाचा मृत्यू; संभाजीनगर हादरले

Chandra Grahan 2026: रक्षाबंधनाला चंद्रग्रहणाचे सावट! भारतात सुतक लागणार की नाही?

SCROLL FOR NEXT