Pushpa 2 Stampede : 'पुष्पा २' स्क्रीनिंगवेळी चेंगराचेंगरी कशी झाली? VIDEO बघून थरकाप उडेल! पाहा

Pushpa 2 Stampede case : हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये ४ डिसेंबर रोजी पुष्पा २ च्या प्रिमियर वेळी झालेल्या चेंगराचेंगरीप्रकरणाचा व्हिडीओ सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
Pushpa 2 stampede case
Pushpa 2 SAAM TV
Published On

Pushpa 2 Stampede : 'पुष्पा 2'च्या प्रीमियरच्या वेळी 4 डिसेंबर रोजी हैदराबादमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाला होता. हैदराबाद पोलिसांनी तपासासंदर्भात तेलगू अभिनेता अल्लू अर्जुनची मंगळवारी 24 डिसेंबर रोजी चार तास चौकशी केली. आता या प्रकरणाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे त्याठिकाणी झालेल्या गोंधळाचा अंदाज बांधता येत आहे.

अल्लू अर्जुनाचा पुष्पा २ चित्रपट चांगलाच चर्चेत आहे आणि यासोबत या चित्रपटाशी जोडलेल्या प्रकरणाबद्दल देखील मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहे. एकीकडे चाहते अल्लू अर्जुनचा दोष नसल्याचे बोलत आहेत तर एकीकडे त्याला कडाडून विरोध होत आहे. अशातच पुष्पा २ च्या प्रीमियरच्या वेळी झालेल्या चेंगराचेंगरीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे सगळे चित्र स्प्ष्ट झाले आहे.

Pushpa 2 stampede case
Border 2 : देशातील सर्वात मोठ्या वॉर फिल्म 'बॉर्डर 2' चे शूटिंग सुरू; सेटवरील पहिला फोटो आला समोर

हा व्हिडीओ x वर स्नेहा मोर्दानी या पत्रकार महिलेने 'हैदराबादमधील #Pushpa2 प्रीमियरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीच्या दिवसाचा व्हिडिओ. एका हृदयद्रावक घटनेत ३५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आणि तिचे मूल गंभीर जखमी झाला. तपास सुरू असताना अधिकाऱ्यांनी अल्लू अर्जुनची चौकशी केली.' असे लिहून शेअर केला आहे.

या प्रकरणानंतर अल्लू अर्जुनाचे वडील निर्माता अल्लू अरविंद यांनी जखमी झालेल्या मुलाची आणि त्याच्या परिवाराची भेट घेतली. या प्रकरणी हैदराबाद पोलिसांनी 13 डिसेंबर रोजी अल्लू अर्जुनला अटक केली आणि नंतर त्याला हायकोर्टातून अंतरिम जामीन मिळाला. अल्लू अर्जुनला अंतरिम जामीन मंजूर करण्यासोबतच न्यायालयाने त्याला या प्रकरणाच्या तपासात सहकार्य करण्याचे आदेश दिले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com