Diljit Dosanjh SAAM TV
मनोरंजन बातम्या

Diljit Dosanjh : 'कसे आहात पुणेकर...' दिलजीत दोसांझचा पुण्यात मराठमोळा ठसका; म्हणाला, मुलगी...

Diljit Dosanjh Talk In Marathi : गायक दिलजीत दोसांझने पुण्यातील कॉन्सर्टमध्ये चाहत्यांशी मराठीत संवाद साधला. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Shreya Maskar

पंजाबी गायक दिलजीत दोसांझ (Diljit Dosanjh ) नेहमीच त्याच्या गाण्यासाठी ओळखला जातो. त्याच्या आवाजाचे चाहते दिवाने आहेत. त्याचे नेहमीच वेगवेगळ्या शहरांत कॉन्सर्ट होत राहतात. त्याच्या कॉन्सर्टसाठी चाहते खूप गर्दी करतात.

आता सध्या दिलजीत त्याच्या 'दिल-ल्यूमिनाटी टूर 2024' कॉन्सर्टमुळे चांगलाच चर्चेत आहे. सध्या सोशल मीडियावर दिलजीतच्या एका कॉन्सर्टचा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. दिलजीतने आपल्या गाण्याचे वेड आता पुणेकरांनाही (Pune ) लावले आहे. दिलजीतचा पुण्यातील कोथरुडमध्ये दमदार कॉन्सर्ट पार पडला. या कॉन्सर्टला पुणेकरांनी जबरदस्त प्रतिसाद दिला. या कॉन्सर्टमध्ये दिलजीतने पुणेकरांशी संवाद (Diljit Dosanjh Talk In Marathi) साधला. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

दिलजीतच्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये तो पुणेकरांशी मराठीत संवाद साधताना दिसत आहे. त्याने मराठीत संवाद साधून चाहत्यांचे मन जिंकले आहे. दिलजीत चाहत्यांना म्हणतो की," कसे आहात पुणेकर? दिलजीत दोसांझ आला रे आला... मुलगी शिकली प्रगती झाली" हे ऐकताच सर्वांकडून शिट्या आणि टाळ्याचा कडकडाट झाला. त्यांनी आपल्या बोलण्यातून 'मुलगी शिकली प्रगती झाली' हा मोठा संदेशही लोकांना दिला आहे.

दिलजीतच्या या व्हिडीओवर तुफान कमेंट्स आणि लाइक्स येत आहेत. चाहते त्याच्या या संवादाचे कौतुक करत आहेत. अलिकडेच दिलजीत दोसांझ 'अमर सिंग चमकिला' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री परिणीत चोप्रा देखील होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

माजी मुख्यमंत्र्यांच्या चालकाला शिवीगाळ अन् मारहाण; पोलीस कर्मचाऱ्यांवर गुन्हा

Maharashtra News Live Update: अन्न व औषध प्रशासनाकडून आंबेगाव व खेड तालुक्यात ५ ठिकाणी धडक कारवाई

Latest Alta Design For Feet: पायांचे सौंदर्य खुलवण्यासाठी ट्राय करा अल्ताचे हे ७ लेटेस्ट डिझाइन्स

Mumbai Pune Expressway Accident: मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर तिहेरी अपघात; दोघांचा जागीच मृत्यू, तिघे जखमी

Mumabi Tourism : गर्दी नाही, गोंधळ नाही; 'येथे' लपलाय अथांग समुद्रकिनारा, जणू मुंबईतला स्वर्गच

SCROLL FOR NEXT