Sharad Pawar Biopic Will Released Soon : महाराष्ट्राच्या राजकारणाने संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले आहे. सत्ताबदल, राजकीय खेळी, पक्षांमधील फुट, डावपेच हे एका वर्षांपूर्वी झालेल्या राज्यनाट्यची पुनरावृत्ती झाली आहे.
भारतातील राजकारणावर आधारिच चित्रपट, वेबसीरीज प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेच आणि येत आहेत. अशातच शाळा, फँड्री, राक्षस या चित्रपटांत्या निर्मात्यांनी नवीन चित्रपटाची घोषणा केली आहे.
शरद पवार यांनी राजकारणातील चाणक्य म्हटले जाते. यांच्या जीवनावर आधारित 'चाणक्य' या चित्रपटाचे पोस्टर निर्माते, दिगदर्शक निलेश नवलाखा यांनी शेअर केले आहे. हा चित्रपट लवकरच आपल्या भेटीला येणार आहे. (Latest Entertainment News)
'चाणक्य' चित्रपटाच्या पोस्टारवर शरद पवार यांचा साताऱ्याच्या लोकसभा पोट निवडणुकीतील एका सभेत पावसात भिजून केलेल्या भाषणाचा फोटो वापरण्यात आला आहे. शरद पवार यांच्या या सभेचे फोटो आणि व्हिडिओ अनेकांनी शेअर केले होतो. या फोटोशी अनेकांच्या भावना जोडलेल्या आहेत.
राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त निर्माता निलेश नवलाखा याने चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन करत असून, 2023मध्ये हा प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट मराठी आणि हिंदी भाषांमध्ये प्रदर्शित होणार असून दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर चित्रपटाचे पोस्ट लॉंच करण्यात आले होते.
निलेश नवलाखा यांनी हे पोस्टर ट्विट केले आहे. पोस्टर ट्विट करताना त्यांनी 'महाराष्ट्राचे खरे चाणक्य श्री शरद पवार साहेब, आम्ही फक्त त्यांच्या सोबतच….' असे लिहिले आहे. तर हिंदी पोस्टर शार करता त्यांनी 'ना मे Tire हू
ना मे Retire हू….
मे सिर्फ Fire हू…
महाराष्ट्र के चाणक्य आज से फिर मैदान मे. ' कॅप्शन दिले आहे.
तर शरद पवार यांची आज नाशिकमधील येवला येथे जाहीर सभा होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आज हे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. नुकतीच त्यांची पत्रकार प्ररिषद झाली त्यात त्यांनी 'ना मे Tire हू, ना मे Retire हू…. मे सिर्फ Fire हू…' हे बोलून दाखवलं आहे.
शरद पवार यांनी त्यांच्या आत्मचरित्र 'तू माझा सांगाती'मध्ये लिहिले आहे. आता हा चित्रपट शरद पावरच्या जीवनातील कोणता पैलू उलघडणार याची अनेकांना नुत्सुक्ता लागली आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.