Priyanka Chopra New Photos Saam Tv
मनोरंजन बातम्या

Priyanka Chopra New Photo: प्रियांका चोप्रा-निकचे नवे फोटो, सोशल मीडियावर व्हायरल

प्रियांकाने नुकताच तिच्या इन्स्टाग्राम हॅंडलवर पती निक जोनस आणि मुलगी मालती मेरी चोप्रा जोनससोबतचे काही फोटो शेअर केले आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Priyanka Chopra New Photo| मुंबई : इंटरनॅशनल आयकॉन आणि बॉलिवूड-हॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची चमक दाखवणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा(priyanka chopra) सध्या भारतापासून दूर म्हणजे परदेशी लॉस एंजेलिसमध्ये पती निक जोनससोबत राहत आहे. परदेशात असली तरी प्रियांका तिच्या चाहत्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्याबद्दलचे अपडेट नेहमी देत असते.

प्रियांकाने नुकताच तिच्या इन्स्टाग्राम हॅंडलवर पती निक जोनस(Nick Jonas) आणि मुलगी मालती मेरी चोप्रा जोनससोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये प्रियांका आपल्या मुलीसोबत स्विमिंग पूलमध्ये पोज देताना दिसत आहे. प्रियांकाचे हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

प्रियांका चोप्राने इन्स्टाग्राम हॅंडलवर स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत तिने 'संडे' असे कॅप्शनमध्ये लिहिले आहे. फोटोमध्ये ती पूलच्या बाजूला उभी राहून फोटो क्लिक करताना दिसत आहे. तिने व्हाइट अॅण्ड ब्लॅक बिकिनीवर व्हाइट सी-थ्रू जॅकेट परिधान केले आहे.

बिकिनीमधील फोटो शेअर करताना प्रियांकाने पती निक जोनस आणि त्यांची मुलगी मालतीसोबतचा आणखी एक अतिशय गोंडस फोटो शेअर केला आहे. हा फोटो तिच्या पूलरॉइड दरम्यान काढला आहे. फोटोमध्ये प्रियांका पूलाच्या बाजूला खुर्चीवर बसलेली दिसत आहे. यादरम्यान त्याने आपल्या मुलीला पकडून पोज देत आहे तर निक तिच्या बाजूला बसला आहे. परंतु ,फोटोमध्ये प्रियांकाने तिच्या मुलीचा चेहरा व्हाइट हार्ट ईमोजीने झाकला आहे.

प्रियांकाने १८ जुलै रोजी तिचा ४० वा वाढदिवस साजरा केला. प्रियांकाने तिचा खास दिवस कुटुंबासह आणि काही खास मित्रांसोबत साजरा केला. प्रियांकाच्या बर्थडे पार्टीला निक जोनास, परिणीती चोप्रा, मधु चोप्रा आदींनी हजेरी लावली होती.

वर्क फ्रंटवर प्रियांका सध्या अनेक प्रोजेक्ट्सवर काम करत आहे. ती लवकरच 'एन्डिंग थिंग्स', 'इट्स ऑल कमिंग बॅक टू मी' या हॉलिवूड चित्रपटात दिसणार आहे. हॉलिवूडशिवाय त्याच्याकडे फरहान अख्तरचा 'जी ले जरा' हा बॉलिवूड चित्रपटही आहे. या चित्रपटात ती कतरिना कैफ आणि आलिया भट्ट या अभिनेत्रींसोबत दिसणार आहे. प्रियांका शेवटची २०१९ मध्ये 'द स्काय इज पिंक' या चित्रपटात फरहान अख्तरसोबत दिसली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : कोल्हापुरात गणेश विसर्जन मिरवणूक रेंगाळली

Dhokla Recipe : ढोकळा जाड होतो? बॅटर नीट होतंच नाही? वाचा मऊसुत ढोकळ्याची रेसिपी

Face Care: विड्याच्या पानांनी तयार केलेला फॅसपॅक लावा चेहऱ्यावर, १५ मिनिटांत स्किन करेल ग्लो

Pune Ganpati Visarjan: दगडूशेठ गणपतीची बैलगाडी मिरवणूक; केरळ मंदिराच्या प्रतिकृतीसह आकर्षक रथ सजवला|VIDEO

Shocking : शाळेत ११ वर्षीय विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण, मुख्याधापकाचं हैवानी कृत्य उघड

SCROLL FOR NEXT