Priyanka Chopra With Cousin Mannara Chopra Instagram
मनोरंजन बातम्या

Priyanka Chopra Photo: प्रियांका चोप्राने जुना फोटो शेअर करत 'बिग बॉस 17' मधील 'या' स्पर्धकाला दिला पाठिंबा

Priyanka Chopra With BB17 Contestant: प्रियांका चोप्राने शेअर केल्या या फोटोची खूप चर्चा होत आहे.

Pooja Dange

Priyanka Chopra Share Photo Of Mannara Chopra:

अभिनेत्री प्रियांका चोप्रा सोशल मीडियावर नेहमीच तिच्या प्रोफेशनल आणि पर्सनल लाईफविषयी अपडेट शेअर करत असते. प्रियांकाने सोशल मीडियवर पोस्ट करत तिच्या काकांच्या मुलीला खास शुभेच्छा दिल्या आहेत.

प्रियांकाने तिच्या इंस्टाग्राम एक जुना फोटो शेअर केला आहे. प्रियांका चोप्रा जेव्हा मिस वर्ल्ड झाली त्यावेळचा तो फोटो आहे. प्रियांका चोप्राने शेअर केल्या या फोटोची खूप चर्चा होत आहे.

(साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

प्रियांका चोप्राने सोशल मीडियावर शेअर केलेला फोटो 'बिग बॉस १७'मधील स्पर्धक मनारा चोप्राचा आहे. मनारा चोप्रा, प्रियांका चोप्रा आणि परिणीती चोप्रा यांची बहीण आहे.प्रियांकाने मनारासोबतच फोटो शेअर करत लिहिले आहे की, 'थ्रोबॅक टू लिटल. मनारा तुला खूप शुभेच्छा!'

'बिग बॉस १७' मधून मनारा चोप्राने नॅशनल टेलेव्हीजनवर पदार्पण केले आहे. मनारा 'बिग बॉस'च्या घरात गेल्यापासून चर्चेत आहे. मनाराला दुसऱ्याच दिवशी स्पर्धकांनी नॉमिनेट केलं होत. त्यामुळे तिला मोठा धक्का बसला होता. तर नुकताच मनाराने इतर स्पर्धकांवर आरोप केला की ते तिला सतत तिच्या कुटुंबाविषयी विचारात आहेत. त्यामुळे ती खूप दुखावली होती. (Latest Entertainment News)

'बिग बॉस'च्या घरातील सदस्य नील आणि ऐश्वर्या तिच्याकडे तिच्या कुटुंबाविषयी विचारणा करत होते. मनाराने ही गोष्ट अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांच्याकडे बोलून देखील दाखवली. 'मी तुम्हाला हे सांगितलं आहे हे कोणाला सांगू नका' असे देखील मनारा अंकिता आणि विकीला म्हणाली.

मनाराची आई, प्रियांकाचे वडील आणि परिणितीचे वडील भावंडे आहेत. ही भावंडे नेहमीच एकमेकांविषयी मुलाखतीत बोलत असतात. हिंदुस्तान टाईम्सला 2018 साली दिलेल्या मुलाखतीत मनारा म्हणाली होती की, 'आम्ही 14 चुलत भावंडे वेगवेगळ्या शहरांमध्ये आणि देशांमध्ये राहतो, पण आमच्या रोजच्या जीवनातील अपडेट WhatsApp ग्रुपवर शेअर करत असतो.

मनारा चोप्रा अभिनेत्री आहे. ती तेलुगू, तामिळ, हिंदी आणि कन्नड चित्रपटांमध्ये सक्रिय आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Samsung Diwali Sale: सॅमसंगची धासू ऑफर, Galaxy S24 FE दिवाळीच्या सेलमध्ये अर्ध्या किमतीत

Maharashtra Live News Update : बदलापुरात 17 हजार बोगस मतदार

सकाळचा एक कप चहा पाहा तुमचं किती नुकसान करतोय

Narak Chaturdashi: नरक चतुर्दशीला कोणत्या देवाचे पूजन करतात? आणि किती दिवे लावावे? जाणून घ्या

10 लाखांचे कर्ज काढले अन्...; घरकाम करणाऱ्या महिलेने 60 लाखांचा 3 BHK फ्लॅट खरेदी केला, प्रकरण कळताच नेटकरी हैराण

SCROLL FOR NEXT