Parineeti-Raghav Wedding Update Instagram
मनोरंजन बातम्या

Parineeti-Raghav Wedding: परिणीतीच्या लग्नाला प्रियंका येणार, पण निक जोनस राहणार गैरहजर; कारण काय?

Parineeti-Raghav Wedding Update: बहीण प्रियांका चोप्रा सुद्धा लग्नासाठी उद्या भारतात येण्याची शक्यता आहे. पण तिच्यासोबत लग्नासाठी निक जोनस येणार नाही.

Chetan Bodke

Parineeti-Raghav Wedding

बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) आणि राघव चड्ढा (Raghav Chadha) हे दोघेही २४ सप्टेंबर रोजी अर्थात उद्या उदयपूरमध्ये एकत्र सात फेरे घेणार आहेत. लग्नासाठी परिणीती आणि राघव उदयपूरसाठी काल रवाना झाले. लग्नामुळे हे कपल खूपच उत्सुक असून परिणीती आणि राघवच्या लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात झाली आहे. यांच्या लग्नाला बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींसह अनेक महत्त्वाचे राजकारणी नेते ही उपस्थित राहणार आहेत. बहीण प्रियांका चोप्रा सुद्धा लग्नासाठी उद्या भारतात येण्याची शक्यता आहे. पण तिच्यासोबत लग्नासाठी निक जोनस येणार नाही.

एका इंग्रजी वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, परिणीती आणि राघवच्या लग्नाला बहीण प्रियंका आणि लेक मालती लग्नाला उपस्थित राहणार आहे. पण परिणीतीच्या लग्नाला निक जोनस उपस्थिती लावणार नाही. कारण तो सध्या, जोनस ब्रदर्सच्या टूरमध्ये व्यस्त आहे. पण प्रियंका आपल्या लेकीसोबत लग्नाला हजर राहणार आहे. परिणीती- राघवच्या साखरपुड्याला सुद्धा निक जोनस उपस्थित राहिला नव्हता. त्यावेळी फक्त प्रियंकाच उपस्थित राहिली होती.

परिणीती आणि राघव लवकरच आपल्या नवीन आयुष्याचा श्रीगणेशा करणार आहेत. लग्नापूर्वी परिणीती आणि राघवने दिल्लीतल्या गुरुद्वारामध्ये जाऊन दर्शन घेतलं. दर्शन घेतानाचे त्यांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यांचा लग्नसोहळा उदयपूरमधील ताज पॅलेसमध्ये अगदी थाटामाटात पार पडणार आहे. सुफी नाईटस आणि अरदासपासून त्यांच्या लग्नसोहळ्याला सुरुवात झाली असून आज संगीताचा कार्यक्रम आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राघव- परिणीतीच्या लग्नात उपस्थित राहणाऱ्या सर्व पाहुण्यांना फोन वापरण्यास मनाई केली आहे.

परिणीतीचा येत्या ६ ऑक्टोबर रोजी ‘मिशन रानीगंज’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. परिणीतीसोबत या चित्रपटामध्ये अक्षय कुमार, कुमुद मिश्रा आणि रवि किशन मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपटाची कथा जयवंत सिंह गिल यांच्या आयुष्यावर आधारित आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: उपमुख्यमंत्री अजित पवार अहिल्यानगरमध्ये दाखल

Pune Rave Party: आधी हॉटेलची रेकी, नंतर आखला एकनाथ खडसेंच्या जावयाला अडविण्याचा डाव; खेवलकरांच्या वकिलांचा धक्कादायक खुलासा

Beed Shocking : बीडमध्ये आणखी एक वैष्णवी जीवाला मुकली, सासरच्या छळाला कंटाळून २० वर्षीय विवाहितेने आयुष्य संपवलं

Rave Vs Party : पार्टी आणि रेव्हमध्ये काय फरक आहे?

Parenting Tips: मुलांना आपले मित्र बनवायचंय? तर फॉलो करा 'या' टिप्स

SCROLL FOR NEXT