Priyadarshini Indalkar Almost Comedy Show PR
मनोरंजन बातम्या

Almost Comedy Show: 'हास्यजत्रा' फेम प्रियदर्शनी अख्ख्या महाराष्ट्राला हसवणार; ‘ऑलमोस्ट कॉमेडी’ चा टीझर बघून खळखळून हसाल!

Priyadarshini Indalkar Almost Comedy Show: अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर ‘ऑलमोस्ट कॉमेडी’ चे सूत्रसंचालन करून ही हास्ययात्रा रंगवणार असून या ऑलमोस्ट कॉमेडीचा टीझर प्रदर्शित झाला आहे.

Shruti Vilas Kadam

Almost Comedy Show: काही दिवसांपूर्वीच एव्हरेस्ट एंटरटेनमेंटने ‘ऑलमोस्ट कॉमेडी’ या नव्या मराठी स्टँडअप कॉमेडी शोची घोषणा केली होती. तेव्हापासूनच या शो विषयी जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक होते. आता ‘ऑलमोस्ट कॉमेडी’ चा जबरदस्त टीझर प्रदर्शित झाला असून नुकतीच याची पहिली झलक एका कार्यक्रमात सादर करण्यात आली.

‘ऑलमोस्ट कॉमेडी’मध्ये, लेखक चेतन डांगे, अमोल पाटील, चिन्मय कुलकर्णी, अक्षय जोशी आणि ऋषिकांत राऊत हे मराठी मनोरंजन क्षेत्रातील काही दिग्गज लेखक, प्रत्यक्ष स्टेजवर येऊन प्रेक्षकांना खळखळून हसवणार आहेत. याआधी त्यांच्या लेखणीतून साकारलेली हास्यनिर्मिती आपण पाहिली आहे, आता त्यांचा स्टेजवरील धमाकेदार परफॉर्मन्स प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हास्य आणणार आहे. आपल्या दिलखेच अंदाजात सूत्रसंचलन करून अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर या शोची रंगत वाढवणार!

पाच लेखकांचे पाच एपिसोड्स रसिकवर्गाला पाहायला मिळणार असून येत्या २४ जानेवारीला ‘ऑलमोस्ट कॉमेडी’ चा पहिला एपिसोड एव्हरेस्ट हास्य मराठी या यूट्यूब चॅनेलवर प्रदर्शित होणार आहे. प्रत्येक शुक्रवारी नवीन एपिसोड प्रदर्शित होईल. या पाच एपिसोड्स व्यतिरिक्त एक एपिसोड नक्कीचं खास ठरेल, कारण प्रियदर्शनी इंदलकर सुत्रसंचलनाबरोबर लेखकांना रोस्ट देखील करणार आहे. या एपिसोडमध्ये प्रेक्षकांना रोस्टिंगचे अनकट सीन पाहायला मिळणार आहेत. आता आठवड्याचा प्रत्येक शुक्रवार हा प्रेक्षकांसाठी हास्याचा खास दिवस ठरेल यात शंकाच नाही.

अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर म्हणाली," मला जेव्हा अमोलचा फोन आला की, आम्ही एक शो करतोय आणि तुला या शोचे होस्टिंग करत या लेखकांना रोस्ट करायचे आहे. मी खूप आश्चर्यचकित झाले, इतके मोठे, अनुभवी कलाकार असूनही त्यांनी मला फोन केला. मी याला एक चांगली संधीच म्हणेन. कारण या आधी मी कधी अशा प्रकारचे काम केले नाही. स्टँडअप हा प्रकार मला ट्राय करायचा होता आणि या शोच्या निमित्ताने मला याचा अनुभव घेता आला. सगळ्यांनी मला या प्रवासात खूप सांभाळून घेतले. मी एव्हरेस्ट एंटरटेनमेंट आणि संजय छाब्रिया यांचे मनापासून आभार मानते. त्यांनी आमच्यावर विश्वास दाखवून आम्हाला ही संधी दिली. आता हा आमचा प्रवास अजून लांबपर्यंत चालणार असून अजून जास्त लोकांपर्यंत हे आम्ही पोहोचवणार आहोत."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Alibag Fishing Boat Capsizes: समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 5 खलाशांनी 9 तास पोहून गाठला किनारा, 3 जण बेपत्ता

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

SCROLL FOR NEXT