Priya Bapat SAAM TV
मनोरंजन बातम्या

Priya Bapat : प्रिया बापट बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्यासोबत शेअर करणार स्क्रीन, चित्रपटाचं पहिलं पोस्टर पाहिलंत का?

Priya Bapat Bollywood Movie : मराठमोळी अभिनेत्री प्रिया बापट बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्यासोबत हिंदी चित्रपटात झळकणार आहे. नुकतेच तिच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.

Shreya Maskar

आपल्या स्टायलिश लूक, हटके अभिनय आणि वैयक्तिक आयुष्यामुळे कायम चर्चेत राहिलेली प्रिया बापट आता एक नवीन प्रोजेक्ट मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तिने आजवर हटके चित्रपट, नाटक, मालिका आणि वेब सीरिज केल्या आहेत. तिच्या अभिनयाचे चाहते दिवाने आहेत. आता प्रिया बापट एका मोठ्या प्रोजेक्टमधून चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.

प्रिया बापट लवकरच एक हिंदी सिनेमातून चाहत्यांच्या भेटीला येत आहे. ज्यात ती प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्यासोबत झळकणार आहे. याची खास पोस्ट प्रियाने सोशल मीडियावर केली आहे. इन्स्टाग्रामवर प्रिया बापटने तिच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहेत. चित्रपटात ती बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत काम करताना पाहायला मिळणार आहे.

Costao या चित्रपटातून प्रिया बापट आणि नवाजुद्दीन सिद्दीकी ही जोडी पहिल्यांदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट 'झी 5' वर प्रदर्शित होणार आहे. मात्र सिनेमाची रिलीज डेट अद्याप जाहीर झाली नाही. मीडिया रिपोर्टनुसार, चित्रपटात नवाजुद्दीन कस्टम ऑफिसरच्या भूमिकेत दिसणार आहे.

प्रिया बापटच्या या पोस्टवर चाहत्यांकडून कमेंट्स, कौतुकाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. चाहते प्रिया बापटला नव्या भूमिकेत पाहायला आतुर आहेत. प्रिया बापटची 'सिटी ऑफ ड्रीम्स' ही वेब सीरिज खूप गाजली. मराठी अभिनेता उमेश कामत (Umesh Kamat) आणि अभिनेत्री प्रिया बापटने (Priya Bapat ) प्रेक्षकांची आवडती जोडी आहे. ही दोघे सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. नवीन वर्षात यांनी नवी कोरी बाईक खरेदी केली आहे. कायम एकमेकांना प्रोत्साहन करताना हे जोडपे पाहायला मिळते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

विधानसभेत अभूतपूर्व गदारोळ! केसीआर यांच्या मुलासह २२ आमदारांचे निलंबन, राजकीय वर्तुळात खळबळ

Myopia in children: मोबाईल-टॅबलेटच्या अतिवापरामुळे मुलांच्या डोळ्यांवर गंभीर परिणाम? पालकांनी ‘ही’ लक्षणं अजिबात दुर्लक्ष करू नयेत

Maharashtra News Live Update: पुण्यात एमपीएससी परीक्षेची करणाऱ्या तरुणाची आत्महत्या

Employee Bonus : २१,००० पर्यंत पगार असणाऱ्या नोकरदारांसाठी आनंदाची बातमी; बोनसच्या नियमात मोठा बदल, पाहा सविस्तर माहिती

Famous Singer : प्रसिद्ध गायकावर हल्ला; थेट गाडीवरच गोळीबार, संगीत विश्वात खळबळ

SCROLL FOR NEXT