Singer Pritam SaamTv
मनोरंजन बातम्या

Singer Pritam : संगीतकार प्रीतमला ऑफिस बॉयनेच घातला ४० लाखांचा गंडा, काय आहे नेमकं प्रकरण? वाचा सविस्तर

Bollywood Sunger Pritam Theft News : बॉलिवूडमधील संगीतकार प्रीतम चक्रवर्ती याच्या ऑफिसमध्ये ४० लाखांची चोरी झाली असून ऑफिस बॉयने ही चोरी केल्याच्या आरोपात ऑफिस बॉयची ओळख पटवली आहे.

Saam Tv

बॉलिवूडमधील संगीतकार प्रीतम चक्रवर्ती याच्या ऑफिसमध्ये ४० लाखांची चोरी झाल्याचं प्रकरण समोर आलं आहे. प्रीतमच्या मॅनेजर विनित चेड्डाने या प्रकरणाची मालाड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी या प्रकरणी प्रीतमचा ऑफिस बॉय आशिष सयालची आरोपी म्हणून ओळख पटवली आहे. तो फरार असल्याने पोलिसांकडून त्याचा तपास सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या सविस्तर माहितीनुसार, प्रीतमचा मॅनेजर विनित चेड्डा यांनी मालाड पोलीस ठाण्यात माहिती दिली की ४ फेब्रुवारीला दुपारी २ च्या सुमारास ही घटना घडली. घटना घडली तेव्हा प्रीतमच्या गोरेगाव येथील म्यूझिक स्टूडियोमध्ये प्रॉडक्शन हाउसचा एक कर्मचारी आला. त्याने प्रीतमच्या मॅनेजरला एका बॅगमध्ये ४० लाख रुपयांची कॅश दिली. यावेळी तिथे आरोपी आशिष सयालसोबत अहमद खान आणि कमल दीशा उपस्थित होते.

मॅनेजर चेड्डाने ते पैसे एका ट्रॉलीत ठेवले. पुढे काही कागदपत्रांवर सही करण्यासाठी चेड्डा प्रीतमच्या घरी गेला. ज्या बिल्डिंगमध्ये ऑफिस तिथेच प्रीतमचं घर आहे. जेव्हा चेड्डा परत ऑफिसमध्ये आला तेव्हा पैशांची बॅग गायब होती. मॅनेजरने आशिषला याप्रकरणी संपर्क केला परंतु कोणतंही उत्तर मिळालं नाही. पुढे आशिषचा फोनही बंद आला. त्यामुळे मॅनेजरने त्याच्यावर संशय व्यक्त केला. प्रीतमच्या सुचनेनुसार मॅनेजर चेड्डाने याप्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली.

सध्या आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी त्याच्या नातेवाईकांशी संपर्क साधला आहे. आशिष सयालला अटक करण्यासाठी पोलीस कसून तपास करत आहेत. मात्र सैफ अली खानच्या घरी चोराने केलेल्या हल्ल्याचं प्रकरण ताजं असतानाच बॉलिवूडमधील प्रसिद्ध संगीतकार असलेल्या प्रीतम चक्रवर्ती याच्या घरी झालेल्या चोरीने चिंता व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sidharth Malhotra Father Passes Away: बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्यावर कोसळला दु:खाचा डोंगर, सिद्धार्थ मल्होत्राला पितृशोक

Gold Rate Today : सोन्याच्या दरात मोठी पडझड; काय आहे दिवसाअखेरचा दर?

मोठी बातमी! मुस्लीम समाजाचं ५ टक्के आरक्षण रद्द, अचानक नेमकं काय घडलं? VIDEO

रशिया-पाकिस्तानमध्ये 'यारीदोस्ती'; भारताच्या संरक्षण सज्जतेपुढे आव्हान, VIDEO

Gram Panchayat Elections: दिवाळीत उडणार ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा बार? मतदानाबाबत नवी अपडेट आली समोर

SCROLL FOR NEXT