Droupadi Murmu On Celebrities Saam Tv
मनोरंजन बातम्या

Droupadi Murmu On Celebrities: 'हानिकारक उत्पादनांच्या जाहिराती टाळा...'; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंचं कलाकारांना आवाहन

Droupadi Murmu On Celebrities: राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कलाकारांना आरोग्यासाठी हानिकारक उत्पादनांचे जाहिरात करणे टाळावे असे आवाहन केले. त्यांचे वक्तव्य सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Shruti Vilas Kadam

Droupadi Murmu On Celebrities: गुजरातमधील एकता नगर येथे मंगळवारी, २२ सप्टेंबर रोजी ७२ वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा पार पडला. यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते २०२४ मधील भारतीय चित्रपटसृष्टीतील उल्लेखनीय कामगिरीसाठी कलाकार आणि चित्रपट क्षेत्रातील कलाकारांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. विशेष म्हणजे, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा पहिल्यांदाच दिल्लीबाहेर आयोजित करण्यात आला.

पुरस्कार वितरणानंतर केलेल्या भाषणात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी लोकप्रिय चित्रपट कलाकारांच्या इन्फ्लुएंसचा उल्लेख करत त्यांना महत्त्वाचा सल्ला दिला आहे. तरुणांवर सेलिब्रिटींच्या बोलण्याचा आणि कृतीचा मोठा प्रभाव पडतो, त्यामुळे कलाकारांनी जाहिरातींमध्ये एखाद्या उत्पादनाशी जोडण्यापूर्वी त्याचा समाजावर आणि जनआरोग्यावर होणारा परिणाम विचारात घ्यावा, असे त्यांनी सांगितले.

राष्ट्रपती म्हणाल्या की, 'देशातील लोकप्रिय चित्रपट कलाकारांकडे लोकांवर, विशेषतः तरुणांवर प्रभाव टाकण्याची मोठी ताकद आहे. जेव्हा प्रसिद्ध कलाकार शिस्तबद्ध जीवनशैली आणि चांगल्या सवयींबद्दल बोलतात, तेव्हा लाखो तरुण त्यांचे अनुकरण करतात. त्यामुळे कलाकारांनी लोकांच्या आरोग्यासाठी हानिकारक असणाऱ्या उत्पादनांचा प्रचार टाळावा.'

'स्टारचे काम प्रकाश पसरवणे असते, अंधार करणे नाही' असा स्पष्ट संदेश राष्ट्रपतींनी यावेळी दिला. मात्र, आपल्या भाषणात त्यांनी कोणत्याही विशिष्ट अभिनेता, अभिनेत्री किंवा ब्रँडचे नाव घेतले नाही. त्यांचे हे वक्तव्य सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

विशेष म्हणजे, ऑगस्ट २०२६ मध्ये महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासनाने (FDA) शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांना ‘विमल इलायची’च्या जाहिरातीसंदर्भात नोटीस बजावली होती. FDAने या जाहिरातीमधून ‘विमल पान मसाला’चे अप्रत्यक्ष म्हणजेच सरोगेट प्रमोशन होत आहे का, असा प्रश्न उपस्थित केला होता. तसेच, संबंधित उत्पादनावर महाराष्ट्रात बंदी असल्याचेही अधिकृत कारवाईच्या वृत्तांमध्ये नमूद करण्यात आले होते. या प्रकरणात तिन्ही कलाकारांना जाहिरातीसंदर्भातील स्पष्टीकरण आणि कागदपत्रे सादर करण्यासाठी १५ दिवसांची मुदत देण्यात आली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सुप्रीम कोर्टाची ज्ञानेश कुमारांना नोटीस SIR विरोधातील लढाईला कायदेशीर बळ?

काशी विश्वनाथाच्या कळसाचं सोनं चोरीला? PMO कडे तक्रार,मंदिर प्रशासनानं आरोप फेटाळले

Friday Horoscope: अडकलेली कामं पूर्ण होतील, या 4 राशींच्या नशीबी आज पैसा; वाचा शुक्रवारचं राशीभविष्य

16 ऑक्टोबरला सरकारविरोधात CJPचा तिरंगा मोर्चा, कनॉट प्लेसचं 'जंतरमंतर' होणार

Fact Check: व्हॉट्सअॅपवर 'NO' लिहाल अकाऊंटमधील पैसे गमवाल? छोट्याश्या चुकीमुळे कष्टाचे पैसे घालवून बसाल?

SCROLL FOR NEXT