Premat Padloy Love Shooting Start Song Saam Tv
मनोरंजन बातम्या

Premat Padloy Love Song: रोमिओ ज्यूलिएटचं खास लव्हसाँग येणार लवकरच चाहत्यांच्या भेटीला, नवी जोडी प्रेक्षकांच्या दिलाचा ठोका चुकवणार

प्रेम आणि प्रेमाने प्रेमावर वाटणारा विश्वास, मनातल्या भावना व्यक्त करणं अलीकडे किती सोप्पं झालंय ना... या वाक्यासाठी योग्य उदाहरण म्हणजे नव्या जोडीचं नवीन रोमँटिक गाणं 'प्रेमात पडलोय'.

Chetan Bodke

Premat Padloy Love Song: प्रेम…प्यार…इश्क… भाषा कोणतीही असो, या भावनेत खूप ताकद असते. प्रेम ही जगातील सुंदर गोष्टींपैकी एक आहे. आजवर इतिहासात ज्यांनी जगावेगळं ठरत प्रेमाला आपलसं केलं, ते अजरामर झाले. मग ते लैला मजनू असो वा रोमिओ ज्युलिएट.. प्रेम ही जगातील एक सुंदर भाषा आहे, ज्याने ही भाषा त्यालाच ती उमगते आणि स्वर्गाहून सुंदर जगाचा शोध त्याला लागतो.

खरं प्रेम व्यक्त करण्यासाठी कोणत्याही दिवसाची आवश्यकता नसते, तरीही अनेकजण आपल्या प्रेमभावना खास व्यक्तीसमोर व्यक्त करतात. अशातच भर घालत निर्माता ऋषिकेश पवार निर्मित 'प्रेमात पडलोय' हे गाणे रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य करण्यास तयार झाले आहे. नुकताच या गाण्याचा मुहूर्त सोहळा संपन्न पार पडला.

प्रेम आणि प्रेमाने प्रेमावर वाटणारा विश्वास, मनातल्या भावना व्यक्त करणं अलीकडे किती सोप्पं झालंय ना... या वाक्यासाठी योग्य उदाहरण म्हणजे नव्या जोडीचं नवीन रोमँटिक गाणं 'प्रेमात पडलोय'. अभिनेता स्वप्निल पवार आणि अभिनेत्री प्रणाली भालेराव ही मराठी मनोरंजन विश्वातील नवी कलाकार जोडी या गाण्यातून रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य करण्यास सज्ज होत आहे.

निर्माता ऋषिकेश पवार निर्मित 'प्रेमात पडलोय' हे गाणं असून या गाण्याचे दिग्दर्शन स्वप्निल पवार पेलवत आहे. स्वप्निल पवार अभिनेता आणि दिग्दर्शक अशी दुहेरी भूमिका साकारताना पाहायला मिळणार आहे. तर या गाण्याला गायक आकाश महालेने सुमधुर स्वरात स्वरबद्ध केले आहे.

प्रणाली भालेराव आणि स्वप्निल पवार अभिनित 'प्रेमात पडलोय' हे रोमँटिक सॉंग रसिक प्रेक्षकांच्या भेटीस कधी येतंय याकडे नक्कीच साऱ्यांच्या नजरा वळल्या असतील. मात्र जास्त वेळ न दवडता हे रोमँटिक सॉंग साऱ्या प्रेक्षकांच्या दिलाचा ठोका चुकवण्यास सज्ज होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Painting: मराठी चित्रकाराचं 67 कोटींचं पेन्टिंग, असं काय दडलंय त्यामध्ये? वाचा सविस्तर...

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी! eKYCच्या नावाखाली फेक वेबसाइट; नेमकं सत्य काय?

Maharashtra Live News Update: उल्हासनगरमध्ये कपड्याच्या गोडाऊनला भीषण आग

Mumbai News : बोरिवली स्टेशनवर फिल्मी स्टाईल दरोडा, ६ जणांनी लाखो रूपयांवर केला हात साफ

Marathwada Floods : बँकांनीही आवळला शेतकऱ्याभोवती फास; सरकारी बँकांचा, सावकारी कारभार, VIDEO

SCROLL FOR NEXT