Team Tukaram Mundhe Saam Tv
मनोरंजन बातम्या

Team Tukaram Mundhe: प्रीती झिंटाचा तुकाराम मुंढेंना पाठिंबा; अभिनेत्रीच्या टी-शर्टची सोशल मीडियावर रंगली चर्चा

Preity Zinta : प्रीती झिंटा मुंबईत ‘टीम तुकाराम मुंढे’ लिहिलेल्या टी-शर्टमध्ये दिसली. तिच्या या हटके अंदाजाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनी तिचं कौतुक केलं आहे.

Shruti Vilas Kadam

Preity Zinta : महाराष्ट्राचे अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे सध्या त्यांच्या धडक कारवाईमुळे चर्चेत आहेत. त्यांच्या कामाची चर्चा आता बॉलिवूडमध्येही पाहायला मिळत आहे. अनेक कलाकारांनी त्यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक केल्याचे पाहायला मिळाले आहे. आता अभिनेत्री प्रीती झिंटा हिनेही हटके अंदाजात तुकाराम मुंढे यांना पाठिंबा दिल्याचे समोर आले आहे.

प्रीती झिंटा नुकतीच मुंबईत स्पॉट झाली. यावेळी तिच्या लूकपेक्षा तिच्या टी-शर्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. अभिनेत्रीने काळ्या रंगाचा टी-शर्ट परिधान केला होता. या टी-शर्टवर ठळक अक्षरांत ‘टीम तुकाराम मुंढे’ असे लिहिलेले होते. तिच्या या लूकचा व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

साधा पण लक्षवेधी लूक

प्रीतीने काळ्या टी-शर्टसोबत क्लासिक ब्लू जीन्स आणि पांढरे स्पोर्ट्स शूज घातले होते. हातात स्टायलिश घड्याळ आणि साधा कॅज्युअल लूक असा तिचा अंदाज होता. नेहमीप्रमाणे तिचा हा साधा आणि क्लासी लूक चाहत्यांना आवडला. मात्र, यावेळी तिच्या टी-शर्टवरील मजकुरामुळे ती चर्चेचा विषय ठरली. तुकाराम मुंढे यांच्या कार्याला पाठिंबा दर्शवण्यासाठीच प्रीतीने हा टी-शर्ट परिधान केल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली आहे.

तुकाराम मुंढे का आहेत चर्चेत?

तुकाराम मुंढे हे त्यांच्या कडक आणि शिस्तबद्ध कार्यपद्धतीसाठी ओळखले जातात. सध्या महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासनात आयुक्त म्हणून कार्यरत असलेल्या मुंढे यांच्या नेतृत्वाखाली अन्नसुरक्षा नियमांच्या अंमलबजावणीवर भर दिला जात आहे. मुंबईसह राज्यातील विविध हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि खाद्यपदार्थांच्या व्यवसायांची तपासणी केली जात आहे. अन्नाची गुणवत्ता, स्वच्छता आणि अन्नसुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधितांवर कारवाई केली जात आहे. या मोहिमेमुळे तुकाराम मुंढे यांचे नाव सोशल मीडियावर चर्चेत आले आहे.

नेटकऱ्यांकडून प्रीतीचे कौतुक

प्रीती झिंटाचा ‘टीम तुकाराम मुंढे’ लिहिलेला टी-शर्ट पाहून सोशल मीडिया युजर्सनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. तिच्या या अंदाजाचे अनेकांनी कौतुक केले आहे. विशेष म्हणजे, यापूर्वी ट्विंकल खन्ना आणि सलमान खान यांनीही मुंढे यांच्या अन्नसुरक्षा मोहिमेचा उल्लेख केल्याचे सांगितले जाते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT