Preity Zinta's Father In Law Passes Away Instagram /@realpz
मनोरंजन बातम्या

Preity Zinta Share Emotional Note: प्रीती झिंटाच्या सासऱ्यांचं निधन; अभिनेत्रीने भावुक पोस्ट करत व्यक्त केल्या भावना

Preity Zinta Remembers Her Father In Law: अभिनेत्री प्रीती झिंटावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Pooja Dange

Preity Zinta Pen Down Emotional Note For Her Late Father In Law:

अभिनेत्री प्रीती झिंटावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अभिनेत्रीच्या सासऱ्यांचे निधन झाले आहे. अभिनेत्री स्वतः पोस्ट करत याविषयी माहिती दिली आहे.

प्रीती झिंटा लग्नानंतर परदेशात स्थायिक झाली आहे. प्रीती चाहत्यांसोबत तिचे कुटुंब आणि सासरचे लोक यासह परदेशातील आयुष्याशी संबंधित अनेक गोष्टी शेअर करत असते. काही तासांपूर्वी अभिनेत्रीने तिचे सासरे जॉन स्विंडलसोबतचा एक फोटो इंस्टाग्रामवर एक भावूक पोस्ट करत ते आता या जगात नसल्याचे सांगितले आहे.

प्रीती झिंटा पोस्ट

प्रीती झिंटाने तिच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, 'डिअर जॉन, मला तुमची उब, तुमचे प्रेम आणि सर्वात जास्त तुमची भन्नाट विनोदबुद्धी आठवत राहील. मला तुमच्यासोबत शूटिंग करायला जायला आवडते, तुमचे आवडते भारतीय पदार्थ बनवायला आणि उन्हात प्रत्येक विषयावर संवाद साधायला आवडायचे.

तुमचे घर आणि तुमचे हृदय माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी खुले केल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. तुमच्याशिवाय ईस्ट कोस्ट आता नेहमीसारखा वाटणार नाही. मला माहित आहे की तुम्ही सध्या शांततेत आणि आनंदी ठिकाणी आहात. विश्रांती घ्या ओम शांती.'

प्रीती झिंटाने तिच्या सासऱ्यांसोबत पोस्ट केलेला फोटो करवा चौथ वेळचा आहे. प्रीती लाल रंगाच्या ड्रेसमध्ये भारतीय वधूप्रमाणे सजलेली दिसत आहे. तिच्या शेजारी राखाडी सूट घातलेले जॉन उभे आहेत. दोघांनीही एकमेकांचा हात घट्ट धरून कॅमेऱ्यासमोर पोज दिली.

1998 मध्ये 'दिल से' चित्रपटातून प्रीतीने पदार्पण केले. तेव्हापासून प्रीती झिंटाने तिच्या सुंदर स्माईलने आणि निरागसतेने लाखो मने जिंकली. 2008 मध्ये कॅनेडियन चित्रपट 'हेवन ऑन अर्थ' मध्ये काम केल्यानंतर 48 वर्षीय अभिनेत्रीने चित्रपटांमधून दोन वर्षांचा ब्रेक घेतला आणि 2013 मध्ये रोमँटिक कॉमेडी 'इश्क इन पॅरिस'मध्ये ती पुन्हा झळकली.

अभिनेत्री, निर्माता, लेखक आणि एका क्रिकेट संघाची सहमालक असलेल्या प्रीतीने 2016 मध्ये लॉस एंजेलिसमधील जीन गुडइनफशी लग्न केले. २०२१ साली प्रीती आणि जीन यांनी सरोगसीने दोन जुळ्या मुलांना जन्म दिला. प्रीती आणि जीनला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. (Latest Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : पुण्यात विसर्जनासाठी गेलेले ४ जणांचा पाण्यात बुडून मृत्यू

Ganesh visarjan 2025 : गणपतीचे विसर्जन करताना विपरीत घडलं, तीन तरुण पाण्यात वाहून गेले

Pune News: पुण्यात दगडूशेठ गणपतीची महाआरती पाहा VIDEO

ITR Filing : टॅक्स रिफंड परताव्याचा फॉर्म अडकून पडलाय? मग 'या' गोष्टी एकदा तपासाच

Akola Accident: गणेश विसर्जन करून परताना भक्तांवर काळाचा घाला; तरुणाचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT