Preity G Zinta Instagram @realpz
मनोरंजन बातम्या

Preity Zinta Birthday: परीक्षेसाठी चित्रपटही नाकारला, अशा हरहुन्नरी प्रीती झिंटाची काय आहे कहाणी

हिमाचलमध्ये जन्मलेली प्रीती बॉलीवूडमधील सर्वात शिक्षित अभिनेत्रींपैकी एक आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Preity Zinta Most Educated Bollywood Actress: बॉलिवूडची डिंपल गर्ल प्रीती झिंटा आज ४८ वर्षांची झाली आहे. इंडस्ट्रीतील सर्वात यशस्वी अभिनेत्रींच्या यादीत प्रीतीची गणना होते. तिने तिच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. हिमाचलमध्ये जन्मलेली प्रीती बॉलीवूडमधील सर्वात शिक्षित अभिनेत्रींपैकी एक आहे. तिला अभ्यासाची इतकी आवड होती की, चित्रपटाचे शूटिंग मधेच सोडून परीक्षा द्यायला गेली होती.

प्रीती झिंटाचा जन्म हिमाचलच्या लष्करी कुटुंबात झाला. त्यांचे वडील आर्मी ऑफिसर होते. दोन भाऊ आणि आई-वडिलांसोबत प्रीतीचे आयुष्य चांगले चालले होते. वयाच्या १३व्य वर्षी तिच्या वडिलांचे कार अपघातात निधन झाले. या अपघातात तिची देखील गंबीर जखमी झाली आणि दोन वर्षे अंथरुणाला खिळून होती. लहान वयात हे सर्व घडल्यामुळे प्रीतीकडून तिचे बालपण हिरावले घेतले गेले.

प्रीतीने तिचे शालेय शिक्षण शिमल्याच्या कॉन्व्हेंट ऑफ जीजस अँड मेरी स्कूलमधून केले. त्यानंतर सेंट बेड कॉलेज शिमला येथून पुढील शिक्षण घेतले. प्रीती अभ्यासात हुशार होती. तिने इंग्रजी ऑनर्समध्ये पदवी आणि गुन्हेगारी मानसशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. प्रीती बॉलिवूडमधील सर्वात शिक्षित अभिनेत्रींपैकी एक आहे.

1996 मध्ये, तिच्या मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीत, ती एका दिग्दर्शकाला भेटली, ज्याने तिला चॉकलेट कमर्शियलमध्ये भूमिका करण्याची ऑफर दिली. यानंतर प्रीतीने अनेक जाहिरातींमध्ये काम केले. मुंबईत एका ऑडिशनदरम्यान दिग्दर्शक शेखर कपूर यांनी प्रीतीला पाहिले आणि त्यांनी तिला अभिनेत्री होण्याचा सल्ला दिला.

त्यानंतर प्रीतीला 'तारा रम पम' चित्रपटाची ऑफर आली, ज्यामध्ये ती हृतिक रोशनसोबत काम करणार होती, पण काही कारणास्तव हा चित्रपट पूर्ण होऊ शकला नाही. यानंतर प्रीतीने कुंदन शाह यांच्या चित्रपटात काम केले, मात्र या चित्रपटाचे प्रदर्शन देखील दोन वर्षांसाठी पुढे ढकलण्यात आला. दोन चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर प्रीतीला 'दिल से' या चित्रपटाची ऑफर आली आणि हा चित्रपट तिचा पहिला प्रदर्शित चित्रपट ठरला.

यानंतर तिने 'क्या कहना', 'हर दिल जो प्यार करेगा', 'मिशन कश्मीर', 'फर्ज', 'चोरी चोरी चुपके चुपके', 'दिल चाहता है', 'अरमान', 'वीर-जारा', 'सलाम नमस्ते', 'कभी अलविदा ना कहना', असे अनेक चित्रपट केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nepal Prime Minister K.P. Sharma Oli resigns : नेपाळमध्ये सत्तापालट; पंतप्रधान ओलींचा राजीनामा

Maharashtra Live News Update: राष्ट्रवादी काँग्रेसचे नागपूरात राज्यस्तरीय एकदिवसीय चिंतन शिबिराचे आयोजन

RBI Recruitment: रिझर्व्ह बँकेत नोकरीची संधी; ऑफिसर पदासाठी भरती सुरु; अर्ज कसा करावा?

Koli Community : कोळी समाजाला हैदराबाद गॅजेट लागू करा; महादेव, मल्हार कोळी समाज आक्रमक

गोकुळचा मोठा निर्णय! लवकरच चीज अन् आईस्क्रीम बाजारात आणणार; शेतकऱ्यांनाही दिलासा

SCROLL FOR NEXT