prashant damle saam tv
मनोरंजन बातम्या

Prashant Damle : राजकारणी हेच उत्तम कलाकार; प्रशांत दामलेंचा मिश्किल टाेला

प्रशांत दामले यांनी माध्यमांशी संवाद साधताना अनेक गाेष्टींवर त्यांचे मत व्यक्त केले.

विजय पाटील

Sangli News : विष्णुदास भावे (vishnudas bhave award) यांच्या नावाने मिळालेले पदक माझ्यासाठी अभिमानाचा क्षण असल्याची नमूद करत राजकारणी हेच उत्तम कलाकार असल्याची मिश्किल टिप्पणी ज्येष्ठ कलावंत प्रशांत दामले यांनी सांगली येथे केली. (Maharashtra News)

मराठी रंगभूमी दिनानिमित्त दिल्या जाणाऱ्या आद्य नाटककार विष्णुदास भावे गौरव पदकाने पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या हस्ते प्रशांत दामले यांना गाैरविण्यात आले. मानाचे पदक, २५ हजार रुपये रोख, मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप होते. त्यानंतर दामले यांनी माध्यमांशी संवाद साधताना अनेक गाेष्टींवर त्यांचे मत व्यक्त केले.

दामले म्हणाले रंगकर्मी हे प्रयोगापुरते नाटक करत असतात मात्र राजकारणी कायम वेगवेगळ्या भूमिकेत नाटक करून उत्तम अभिनयाची साक्ष देतात. त्यामुळे राजकारणी हेच उत्तम कलाकार असतात असा मिश्किल टोला त्यांनी लगावला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान नाट्यगृहाची परिस्थिती, अवस्था बदलली पाहिजे यासाठी आजही आपण पाठपुरावा करत असल्याचे देखील दामले यांनी नमूद केेले. यावेळी विविध क्षेत्रातील कलाकार उपस्थित हाेते.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

चीनमुळे नेपाळमध्ये महाप्रलय? 300 जणांचा मृत्यू, शेकडो भारतीय बेपत्ता

Facebook, INSTA वर दररोज 6 तासांची बंदी; 18 वर्षांखालील मुलांसाठी कडक नियम

Punjab Politics: भाजप आणि शिरोमणी अकाली दलाची युती होणार की तुटणार? दोन्ही पक्षातील नेमका तिढा काय?

खाऊन पिऊन आंदोलन करा, झिरवाळांचा आदिवासी आंदोलकांना अजब सल्ला

Farmer Success Story : वावरची पॉवर! शेतकरी महिलेची भरारी; शेतीतून लाखोंची कमाई, यशाची त्रिसूत्री, प्रवास वाचून थक्क व्हाल!

SCROLL FOR NEXT