Mahaparinirvaan First Look Saam Tv
मनोरंजन बातम्या

Mahaparinirvaan First Look: महामानवाच्या दिव्य आणि तेजस्वी राखेच्या कणांतून घडलेली...,'महापरिनिर्वाण'चा फर्स्ट लूक आऊट

Mahaparinirvaan Movie: या चित्रपटामध्ये 'महाराष्ट्राची हास्य जत्रा' फेम अभिनेता गौरव मोरे देखील दिसणार आहे. पण गौरव मोरे या चित्रपटात नेमकी काय भूमिका साकारणार आहे हे अद्यापही समजू शकले नाही.

Priya More

Prasad Oak And Gaurav More Movie Mahaparinirvaan:

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा (Dr Babasaheb Ambedkar) आज महापरिनिर्वाण दिन आहे. महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने (Mahaparinirvaan Day) मराठी चित्रपट 'महापरिनिर्वाण'चा फर्स्ट लूक (Mahaparinirvaan First Look) प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. चित्रपटाच्या फर्स्ट लूकमध्ये बाबासाहेबांच्या अंतयात्रेतील लाखों लोकांची गर्दी दिसत आहे. जी त्यांच्या शक्तिशाली कथाकथनाने मार्मिकपणे प्रेक्षकांना मोहित करत आहे.

"माणूस मेल्यावर त्याची राख होते, आपण राख विसर्जित करतो, पण मला त्या राखेच्या दिव्य आणि तेजस्वी कणातूनच इतिहास घडवायचाय." असे म्हणत अभिनेता प्रसाद ओक यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणदिनी घडलेल्या गुंतागुंतीच्या भावना आणि घटनांचा उलगडा करणाऱ्या श्री नामदेवराव व्हटकर यांची भूमिका साकारली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

गेल्या काही दिवसांपासून ‘महापरिनिर्वाण’ चित्रपटाची जोरदार चर्चा होत आहे. या चित्रपटामध्ये 'महाराष्ट्राची हास्य जत्रा' फेम अभिनेता गौरव मोरे देखील दिसणार आहे. पण गौरव मोरे या चित्रपटात नेमकी काय भूमिका साकारणार आहे हे अद्यापही समजू शकले नाही. याव्यतिरिक्त या चित्रपटात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका कोण साकारणार? हे सुद्धा अद्याप गुलदस्त्यात आहे. या चित्रपटाचा फर्स्ट लूक पाहून प्रेक्षकांना चित्रपटाबाबतची उत्सुकता वाढली आहे.

भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीमध्ये उल्लेखनीय योगदान असलेला, दलितांच्या हक्कांसाठी लढलेला, समाजाच्या विविध क्षेत्रातील लोकांची जात, धर्माचा विचार न करता, सामाजिक न्याय आणि समतेसाठी लढणारा दूरदर्शी नेता आणि समाजसुधारक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या निधनानंतर लाखों लोकांनी शोक व्यक्त केला होता. 'महापरिनिर्वाण' हा चित्रपट या ऐतिहासिक प्रसंगाचा समाजावर आणि त्या व्यक्तीच्या जीवनावर झालेल्या खोल परिणामांवर प्रकाश टाकणारा आहे. अभिनेता प्रसाद ओकने देखील आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंवटर 'महापरिनिर्वाण' चित्रपटाचा फर्स्ट लूक शेअर केला आहे.

‘महापरिनिर्वाण’ चित्रपटाच्या माध्यमातून अभिनेता प्रसाद ओक, गौरव मोरे, अंजली पाटील, कमलेश सावंत, दीपक करंजीकर, प्रफ्फुल सावंत , विजय निकम , हेमल इंगळे आणि कुणाल मेश्राम यासारखे नामवंत कलाकार प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. कल्याणी पिक्चर्स प्रस्तुत, कल्याणी पिक्चर्स आणि अभिता फिल्म प्रोडक्शन निर्मित 'महापरिनिर्वाण' या चित्रपटाचे दिग्दर्शन शैलेंद्र बागडे यांनी केले आहे. या चित्रपटाचे निर्माते सुनील शेळके तर सहनिर्माते आशिष ढोले आहेत. संगीतकार विजय गावंडे असून गुरु ठाकूर हे या चित्रपटाचे गीतकार आहेत. अमर कांबळे यांनी 'महापरिनिर्वाण'चे छायाचित्रीकरण केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुंबईत बच्चू कडूंच्या प्रहार संघटनेचं आंदोलन

Diabetes kidney damage symptoms: डायबेटीजमुळे किडनी खराब होण्यापूर्वी शरीरात दिसतात 'हे' बदल; निकामी होण्यापूर्वी लक्ष द्या

पेट्रोल पंप मालकाच्या पाळीव कुत्र्याचा ग्राहकावर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ आला समोर

Actor Passes Away: प्रसिद्ध अभिनेत्याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; वयाच्या ६७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

School Bus Accident : विद्यार्थ्यांनी भरलेल्या बसला अपघात; समोरच्या वाहनाने हुलकावणी दिल्याने बस उलटली, विद्यार्थी जखमी

SCROLL FOR NEXT