Prajakta Mali SAAM TV
मनोरंजन बातम्या

Prajakta Mali : प्राजक्तासोबत फोटो काढण्यासाठी चाहत्याची धडपड; थेट लिफ्टच्या दारात उभा राहीला, पाहा VIDEO

Prajakta Mali Viral Video : मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळीचा सध्या एक व्हिडीओ सोशल मीडिया व्हायरल होत आहे. ज्यात एक चाहता तिच्या सोबत फोटो काढण्यासाठी चक्क लिफ्ट थांबवताना दिसत आहे.

Shreya Maskar

महाराष्ट्राची क्रश प्राजक्ता माळी (Prajakta Mali ) कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. त्याच्या सौंदर्याचे चाहते दिवाने आहेत. तिच्या फोटोंवर कायम केमेंट्सचा वर्षाव पाहायला मिळतो. तिला पाहण्यासाठी चाहते कायम उत्सुक असतात. तिचा मोठा चाहता वर्ग आहे. अशातच प्राजक्ता माळीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये एक चाहता प्राजक्ता माळीसोबत सेल्फी काढण्यासाठी आटापिटा करताना दिसत आहे.

प्राजक्ता माळीने 'येरे येरे पैसा 3' या चित्रपटाच्या स्क्रिनिंगला हजेरी लावली होती. तेव्हा प्राजक्ता लिफ्टमधून जात होती. चाहत्याने चक्क तिची लिफ्ट रोखली आणि तिच्यासोबत फोटो काढला. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता प्राजक्ता माळी लिफ्टमध्ये जात असते. लिफ्टचे बटण दाबल्यानंतर चाहत्याने लिफ्ट मध्ये हात टाकून ती थांबवली. लिफ्टचे दार बंद होताना चाहता त्यामध्ये अडकला.

चाहत्याला मदत करत प्राजक्ता देखील पायाने लिफ्ट अडवताना व्हिडीओत दिसत आहे. त्यानंतर प्राजक्ता चाहत्याला कॅमेरात पाहायला सांगते. अखेर चाहत्याला प्राजक्ता माळी सोबत फोटो मिळतो. या व्हिडीओवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. खतरनाक माणूस,फॅन मुमेंट अशा प्रतिक्रिया व्हिडीओवर येत आहेत.

प्राजक्ता माळी सध्या 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या शोमधून चाहत्यांच्या भेटीला येत आहे. प्राजक्ता ही अभिनेत्रीसोबतच एक उत्तम कवियत्री, यशस्वी व्यावसायिका देखील आहे. तिचा 'फुलवंती' चित्रपट खूप गाजला आहे. चाहते तिच्या आगामी सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live Update: थकीत बिलासाठी कंत्राटदारचा आत्मदहनाचा प्रयत्न

Actress Accident: 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीच्या कारला भीषण अपघात, बसनं दिली धडक

Kangana Ranaut: 'डेटिंग अ‍ॅप्स 'गटार' आहेत'; कंगना रनौतला नाही आवडत डेटिंग अ‍ॅप्स, कारण सांगत म्हणाली...

MLA Ashish Deshmukh : बाईकवर स्टंट करणं भाजप आमदाराला पडलं महागात, पोलिसांनी केली मोठी कारवाई; VIDEO व्हायरल होताच...

New cancer diagnosis method: आता केवळ आवाजाने समजणार तुम्हाला कॅन्सर झालाय ते; शास्त्रज्ञांनी शोधली नवी पद्धत

SCROLL FOR NEXT