Siddhi Hande
जिनिलिया देशमुख ही मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
जिनिलियाने साउथ इंडस्ट्रीमध्येही काम केले आहे. तिने आपल्या करिअरची सुरुवात टॉलिवूडमधूनच केली होती.
जिनिलियाने नुकतेच सोशल मीडियावर घागऱ्यातील सुंदर फोटो शेअर केले आहेत.
जिनिलियाच्या घागऱ्या छान कलरफुल प्रिंट आहे.
जिनिलियाने केसांची छान वेणी घातली आहे. त्यावर छान अबोलीचा गजरा माळला आहे.
जिनिलियाच्या या फोटोंवर नवरा रितेश देशमुखने कमेंट केली आहे. खूपच सुंदर बायको, असं त्याने म्हटलं आहे.
जिनिलिया आणि रितेश देशमुख हे बॉलिवूडमधील स्टार कपल आहे. ते नेहमीच प्रेक्षकांचे मनोरंजन करत असतात.