Prabhudeva Birthday Instagram @prabhudevaofficial
मनोरंजन बातम्या

Prabhu Deva Salman Khan Connection: सलमानच्या वाईट काळात 'देवा' धावून आला... काय आहे कहाणी जाणून घ्या

Prabhu Deva's Birthday: प्रभू देवाने पहिल्यांदा सलमान खानसोबत 2009 मध्ये आलेल्या 'वॉन्टेड' चित्रपटात काम केले होते.

Pooja Dange

Prabhu Deva's Birthday Special: दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील चित्रपटनसह त्यांची गाणी आणि डान्स देखील भन्नाट असतात. दाक्षिणात्य सिनेसृष्टीने असाच एक डान्सर भारताला दिला. सुपर टॅलेंट हा अभिनेता थोडा लाजरा आहे. पण डान्स करताना तो सर्वांना आश्चर्यचकित करतो. हा डान्सर आणि अभिनेता म्हणजे भारताचा मायकल जॅक्सन अर्थात प्रभू देवा. प्रभू देवा भारतातच नाही तर परदेशातही त्याच्या डान्ससाठी प्रसिद्ध आहे.

प्रभूदेवाचा आज वाढदिवस आहे. प्रभुदेवाचा जन्म कर्नाटकातील म्हैसूर येथे झाला. प्रभू देवाचे वडील मुगुर सुंदर हे साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कोरिओग्राफर होते. प्रभुदेवाने आपल्या वडिलांप्रमाणे डान्सर बनण्याचे स्वप्न पाहिले आणि ते साकार केले. भरतनाट्यम व्यतिरिक्त त्याने अनेक शास्त्रीय नृत्य प्रकार शिकले आहेत.

प्रभू देवाने केवळ नृत्यातच अप्रतिम कामगिरी दाखवली नाही तर बॉलीवूडच्या भाईजान म्हणजेच सलमान खानची संपत चाललेली कारकीर्दही सावरली आहे. 2002 ते 2007 या काळात सलमानची कारकीर्द जवळपास ठप्प झाली होती. सलमानचे अनेक चित्रपट सतत फ्लॉप होत होते आणि आशेचा एकही किरण दिसत नव्हता.

अशातच प्रभुदेवाने देवदूत बनून सलमान आला त्याचे संपत चाललेलं करिअर सावरले. प्रभू देवाने पहिल्यांदा सलमान खानसोबत 2009 मध्ये आलेल्या 'वॉन्टेड' चित्रपटात काम केले होते. या चित्रपटाद्वारे प्रभू देवाने बॉलिवूडमधील दिग्दर्शनास सुरुवात केली. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रभू देवाने केले. नृत्यात प्रभुत्व मिळवलेल्या प्रभू देवाने दिग्दर्शनातही कमाल केली होती. हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला.

90 च्या दशकातील हमसे है मुकाबला या चित्रपटामध्ये प्रभू देवा दिसला होता. या चित्रपटात प्रभुदेवाने केलेला डान्स पाहून प्रेक्षक थक्क झाले होते. आजही प्रभूदेवाचे नृत्य लोकांच्या हृदयात आणि मनात घर करून आहे. प्रभू देवा हा दाक्षिणात्य चित्रपटातील यशस्वी अभिनेता आणि दिग्दर्शक आहे, पण तरीही त्यांची बॉलिवूड चित्रपटसृष्टीत एक उत्तम डान्सर म्हणून ओळख आहे.

प्रभू देवाने 1995 मध्ये रामलतसोबत लग्न केले होते. रामलत मुस्लिम आणि शास्त्रीय नृत्यांगना होत्या. लग्नानंतर रामलतने हिंदू धर्म स्वीकारला आणि तिचे नाव बदलून लता असे ठेवले. लग्नाच्या काही काळानंतर प्रभू देवा साऊथ अभिनेत्री नयनतारा यांना डेट करत असल्याच्या बातम्या आल्या होत्या, त्यामुळे त्याची पत्नी लताने त्याला घटस्फोट दिला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kharadi Rave Party: जावई खेवलकरांच्या मोबाईलमध्ये अश्लील व्हिडिओ फोल्डर, चाकणकरांच्या आरोपांनंतर सासरे खडसेंचा पारा चढला

Gold Found: भारताच्या हृदयात सोन्याची खाण, जबलपूरच्या भूमीत लपलाय 'सोन्याचा खजिना

Ajit Pawar: जादूची कांडी नाही माझ्याकडे – विकासकामांवरील तक्रारींवर अजित पवारांचा संताप|VIDEO

Plane Crash : भयंकर! विमान थेट शाळेच्या इमारतीवर कोसळलं; 6 जणांचा मृत्यू

Maharashtra Live News Update: सात वर्षीय अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरण; शिक्षक फरार, चार आरोपी अटकेत

SCROLL FOR NEXT