Mumbai Police News Saam Tv
मनोरंजन बातम्या

Powai Hostage Case : पवईतील ओलिसनाट्य प्रकरणात चौकशीचा फास आवळला; सेलेब्रिटी कलाकारांसह बड्या राजकीय नेत्याची चौकशी होणार

Mumbai Police News : मुंबईतील पवई ओलिसनाट्य प्रकरणात गुन्हे शाखेने चौकशीचा फास आवळला आहे. रोहित आर्याच्या संपर्कात असलेल्या मराठी कलाकारांची चौकशी होणार असून, राजकीय नावंही पुढे येत आहेत. हे प्रकरण आता नवं वळण घेण्याची शक्यता आहे.

Alisha Khedekar

पवईतील आर. ए. स्टुडिओमध्ये रोहित आर्याने २० जणांना ओलीस ठेवले

पोलिसांच्या कारवाईदरम्यान झालेल्या गोळीबारात रोहित आर्याचा मृत्यू

गुन्हे शाखेने तपास हाती घेत कलाकार आणि स्टुडिओतील सर्वांच्या जबाबांची नोंद सुरू केली आहे

राजकीय क्षेत्रातील मंत्री दीपक केसरकर यांचं नाव पुढे येत असून प्रकरण नवं वळण घेणार

मुंबईतील पवई येथे काही दिवसांपूर्वी झालेल्या ओलिसनाट्य प्रकरणाबाबत नवी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणी गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी चौकशीचा फास आवळला असून रोहीत आर्या याच्या संपर्कात असलेल्या प्रत्येकाचा जबाब नोंदविण्यात येणार आहे. तसेच या प्रकरणात काही सिनेकलाकारांची देखील चौकशी होणार असल्याचे वृत्त आहे.

पवईच्या महावीर क्लासिक इमारतीमधील आर. ए. स्टुडिओमध्ये रोहित आर्याने १७ मुलांसह २० जणांना ओलिस ठेवले होते. त्यांची सुटका करण्यासाठी स्टुडिओत शिरलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल वाघमारे यांनी रोहितवर गोळी झाडली. या ओळीबारात रोहितच्या छातीत गोळी लागल्याने त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी अपमृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.

या रोहित आर्यांशी काही मराठी कलाकारांनीही संपर्क साधला होता. तसेच मुलांचे ऑडिशन सुरु असताना तिथे अभिनेते गिरीश ओक यांनी स्टुडिओला भेट दिली होती. तर रुचिता जाधव या मराठी अभिनेत्रीने सांगितल्याप्रमाणे तिलाही रोहितने त्याच्या स्टुडिओमध्ये भेटण्यासाठी बोलावले होते. तसेच तिच्यासह अनेक कलाकारांना रोहितने स्टुडिओत येण्यासाठी संपर्क साधला होता. स्टुडिओला भेट देणाऱ्या, या कालावधीत रोहितने संपर्क साधलेल्या प्रत्येकाची चौकशी केली जाणार असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

सहाय्यक निरीक्षक अमोल वाघमारे यांनी रोहितवर गोळी झाडली त्यामुळे त्यांचाही जबाब नोंदविण्यात आला आहे. त्यांनी दिलेल्या जबाबानुसार, स्टुडिओमध्ये नेमकं काय घडलं? याची शहानिशा करण्यासाठी आतमध्ये उपस्थित असलेल्या प्रत्येकाचा जबाब नोंदवण्यात येणार असल्याचे सांगितले.

पालकांचेही सविस्तर जबाब नोंदवणे बाकी असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. स्टुडिओ मालक तसेच स्टुडिओतील इतर कर्मचारी, प्रत्यक्षदर्शी यांचे जबाब नोंदवण्यात आले आहे. दरम्यान या प्रकरणी कलाकारांसोबतच राजकीय क्षेत्रातील मंत्री दीपक केसरकर यांचं नाव वारंवार समोर येत असल्याने त्यांचीही चौकशी होणार असल्याचं म्हटलं जात आहे. हे प्रकरण आता कोणतं नवं वळण घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : चिखलदरामध्ये सुंदर हिल स्टेशन करण्यात येईल - मुख्यमंत्री

पर्यटक तरूणीकडे आधी शरीरसंबंधाची मागणी, भररस्त्यावर हस्तमैथून; पीडितेनं VIDEO शूट करून व्हायरल केला, नेमकं घडलं काय?

Health Care : गुडघ्यांचं दुखणं थांबवण्याचा रामबाण उपाय, वापरा 'हे' घरगुती तेल

Palghar: बाळंतीण महिलेला रुग्णवाहिकेनं अर्ध्या रस्त्यात सोडलं, बाळाला घेऊन २ किमीपर्यंत पायपीट; पालघरमधील संतापजनक घटना

Supreme Court : निवडणूक आरक्षणावर कोर्टात काय झालं? सर्वोच्च न्यायालयाने सरकार अन् आयोगाला झापलं

SCROLL FOR NEXT