Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Saam Tv
मनोरंजन बातम्या

FIR Filed: Tarak Mehta Ka Ooltah Chashmahच्या निर्मात्यांसह तिघांवर गुन्हा दाखल, अभिनेत्रीचा लैंगिक छळाचा आरोप

FIR Filed On Asit Modi and Others: मालिकेतील अभिनेत्रीच्या तक्रारीवरुन पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Mumbai News : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही मालिका सततच्या वादांमुळे चर्चेत आहे. आत पुन्हा एकदा ही मालिका चर्चेत आली आहे. कारण या प्रसिद्ध मालिकेचे निर्माते असित मोदी आणि ऑपरेशन हेड सोहेल रमानी आणि कार्यकारी निर्माता जतिन बजाज यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. मालिकेतील अभिनेत्रीच्या तक्रारीवरुन पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

मालिकेचे निर्माते आणि इतर व्यक्ती लैंगिक छळ करत असल्याचा आरोप अभिनेत्रीने केला होता. याप्रकरणी पोलिसांनी भादंवि ३५४ आणि ५०९ कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

पवई पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत. याप्रकरणी अद्याप कुणालाही अटक झालेली नाही. तारक मेहताच्या कोणत्या अभिनेत्रीने निर्मात्यावर गुन्हा दाखल केला आहे, याबाबत कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही. (Latest News Update)

यापूर्वी दया बेनची भूमिका साकारणाऱ्या दिशा वकानीलाही वाईट वागणूक दिल्याने तिने शो सोडल्याचे समोर आले होतं. यासोबतच अभिनेत्री मोनिका भदोरियाने सांगितले होते की, शोमध्ये अनेकदा अभिनेत्यासोबत भांडणही झाले होते. (Entertainment News)

अशारितीने आतापर्यंत अनेक कलाकार शोमधून बाहेर पडले आहेत. दिशा वकानी व्यतिरिक्त शैलेश लोढा आणि अंजली भाभी यांच्या भूमिकेत असलेल्या नेहा मेहता यांनीही शो सोडला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : लोणावळा रेल्वे मार्गावर १० दिवस ब्लॉक

Kankavli Politics : आमदार निलेश राणे संदेश पारकरांच्या घरी, मंत्री उदय सामंत उपस्थित

Success Story: रोज ७-८ तास अभ्यास, रेल्वेत नोकरी करत दिली UPSC; तिसऱ्या प्रयत्नात IAS; रिया सैनी यांचा प्रेरणादायी प्रवास

Kendra Trikona Rajyog: शनीने तयार केला केंद्र त्रिकोण राजयोग; 'या' राशींचं नशीब बदलून मिळणार घवघवीत यश

Dharmendra Death: महानतेचं उदाहरण...! धर्मेंद्र यांच्या निधनाने अमिताभ बच्चन भावूक, जिगरी दोस्तासाठी लिहिली खास पोस्ट

SCROLL FOR NEXT