dilip joshi goggle
मनोरंजन बातम्या

Dilip Joshi: तारक मेहता फेम जेठालाल आहे कोट्यवधींचा मालक; मालिकेच्या एका एपिसोडसाठी घेतो तब्बल १.५ लाखांचं मानधन

Dilip Joshi Net Worth: अभिनेता दिलीप जोशी तारक मेहता का उल्टा चष्मा कार्यक्रमामुळे खूप प्रसिद्ध आहे. दिलीप जोशीच्या दमदार अभिनयाने सर्व चाहत्यांची मने जिंकली आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अभिनेता दिलीप जोशी 'तारक मेहता का उल्टा चष्मा' कार्यक्रमामुळे खूप प्रसिद्ध आहे. दिलीप जोशी यांची या कार्यक्रमातील 'जेठालाल गडा' भूमिका सर्व चाहत्यांना फार आवडते. टेलिव्हिजनवरील गुजराती व्यवसायाची भूमिका दिलीप जोशी साकारताना पाहायला मिळाले आहे. तारक मेहता उल्टा चष्मामधील दिलीप जोशीनी त्यांच्या हास्यविनोदामुळे सर्वांची मने जिंकली आहेत. घराघरांमध्ये हा कार्यक्रम सर्व प्रेक्षक अजूनही आनंदाने पाहत असतात. अभिनेता दिलीप जोशीने १५ वर्षे हून अधिक काळ प्रेक्षकांना आनंदित करण्यासाठी या कार्यक्रमात घालवला आहे. सोशल मिडियावर देखील दिलीप जोशी म्हणजे जेठालाल गडा यांचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. दिलीप जोशीच्या उत्कृष्ट अभिनयामुळे त्यांनी सर्व प्रेक्षकांना आपले अभिनयाचे वेड लावले आहे. पण आज त्यांच्या उत्तम यशामुळे त्यांनी करोडोंची संपत्ती कमावली आहे. दिलीप जोशीचीं एकूण संपत्ती किती आहे, हे जाणून घेऊयात.

जेठालालने 'मैने प्यार किया' या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. दिलीप जोशी हे चित्रपटांमधून देखील पैसे कमवत असतात. अभिनेता दिलीप जोशी 'तारक मेहता उल्टा चष्मा' मधील मुख्य भूमिकेसाठी प्रति एपिसोड १. ५ लाख रुपये घेतो. दिलीप जोशी एका आठवड्यातील शो मधून ७.५ लाख रुपये कमवत असतो. अभिनेत्याची रिअल इस्टेट, व्यवसाय यांसारख्या गोष्टींमध्ये देखील गुंतवणूक आहे. दिलीप जोशी यांच्या अनेक ठिकाणी मालमत्ता देखील आहेत. अभिनेता दिलीप जोशीची मुंबईमध्ये अपार्टमेंट आणि अलिशान बंगले आहेत. अभिनेत्याने गोरेगाव परिसरात एक अलिशान घर खरेदी केले आहे. दिलीपच्या त्या घराची किंमत ५ कोटी रुपये आहे. दिलीप जोशी यांची डीजे प्रोडक्शन नावाची कंपनी देखील आहे. या कंपनीमधून देखील दिलीप जोशी पैसे कमवत असतो.

दिलीपने त्याच्या अप्रतिम अभिनयाने आज ऐवढे मोठे यश कमावले आहे. दिलीपला महागड्या कारची प्रचंड आवड आहे. त्याच्याकडे ऑडी Q7 आहे, या कारची किंमत ८२ लाख रुपये आहे. त्याचबरोबर दिलीपकडे एक टोयाटा इनोव्हा आहे, ज्याची किंमत सुमारे १४ लाख रुपये आहे. दिलीपक़े मर्सिडीज बेंझ देखील आहे. दिलीप जोशी यांनी 2021 मध्ये KIA Sonet Subcompact SUV १२.२९ लाख रुपयाला खरेदी केली आहे. तारक मेहता का उल्टा चष्मा कार्यक्रमामुळे आज दिलीप घराघरांमध्ये खूप प्रसिद्ध आहे. दिलीपच्या दमदार यशामुळे तो आज ४७ कोटी रुपये संपत्तीचा मालक आहे.

Ambernath Accident: अंबरनाथमध्ये भीषण अपघात, ४ जणांचा मृत्यू, अपघातग्रस्त कारमध्ये शिवसेनेच्या महिला उमेदवार

IAS Transfers: पुणे महापालिकेतील उपायुक्तांच्या पुन्हा बदल्या; अधिकारी धास्तावले

भाजपचा क्लीन स्वीप? १०० पेक्षा अधिक नगरसेवकांनी बिनविरोध उधळला विजयाचा गुलाल, स्थानिक पातळीवर कमळ फुललं |VIDEO

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडकीवर कारवाईचा बडगा? KYC मुळे सरकारी लाडकीचा भांडाफोड

Horoscope: 'या' ५ राशींच्या नशिबाचे चमकतील तारे; यशासह धनलाभाचा योग, जाणून तुमचं राशीभविष्य

SCROLL FOR NEXT