Jabrat Hindavi Patil – Surekha Kudchi 
मनोरंजन बातम्या

Jabrat: हिंदवी पाटील–सुरेखा कुडची यांची ठसकेबाज जुगलबंदी; 'जब्राट'मध्ये रंगणार लावणीचा फड

Hindavi Patil – Surekha Kudchi: लोकप्रिय लावणी नृत्यांगना हिंदवी पाटील आणि अभिनेत्री सुरेखा कुडची ‘जब्राट’ या मराठी चित्रपटात एकत्र लावणीचा फड गाजवणार आहेत. हा चित्रपट येत्या ६ फेब्रुवारीला चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

Shruti Vilas Kadam

Jabrat Hindavi Patil – Surekha Kudchi : महाराष्ट्राची लोककला, अस्सल ठेका आणि नखरेल अदाकारी यांचा संगम म्हणजे लावणी. रसिकांच्या काळजाला हात घालणारी ही कला आजही तितक्याच ताकदीने प्रेक्षकांना भुरळ घालत आहे. आता हीच लावणी नव्या दमदार रूपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून लोकप्रिय लावणी नृत्यांगना हिंदवी पाटील आणि प्रसिद्ध अभिनेत्री व नृत्यांगना सुरेखा कुडची पहिल्यांदाच एकत्र लावणीचा फड गाजवताना दिसणार आहेत. ‘जब्राट’ या आगामी मराठी चित्रपटात या दोघींची एक बहारदार, ठसकेबाज लावणी प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे.

तारा करमणूक निर्मित आणि प्रगती कोळगे दिग्दर्शित ‘जब्राट’ हा चित्रपट येत्या ६ फेब्रुवारीला प्रदर्शित होत असून त्यातील या खास लावणीची झलक नुकतीच सोशल मीडियावर प्रदर्शित झाली आहे. या झलकीत हिंदवी आणि सुरेखा यांची जुगलबंदी पाहून रसिकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. दोघींच्या नृत्यातील आत्मविश्वास, भावनांची अभिव्यक्ती आणि ठसकेदार हालचाली लावणीला एक वेगळाच रंग देतात.

या लावणीचे बोल —
“किती सावरू पुन्हा पुन्हा,
कशा झाकू या खाणाखुणा,
नाही बिचाऱ्या पदराचा या गुन्हा”

हे डॉ. जयभीम शिंदे यांनी लिहिले असून त्यांना हिंदवी पाटील आणि सुरेखा कुडची यांनी आपल्या मोहक अदाकारीने जिवंत केले आहे. बेला शेंडे यांच्या दमदार आवाजात ही लावणी साकारली असून संगीतकार डॉ. जयभीम शिंदे यांनी ठेका धरायला लावणारे संगीत दिले आहे. या बहारदार लावणीचे नृत्यदिग्दर्शन आशिष पाटील यांनी केले असून पारंपरिक आणि आधुनिक नृत्यशैलीचा सुंदर मिलाफ यात पाहायला मिळतो.

हिंदवी आणि सुरेखा दोघींनीही या लावणीबाबत आपला आनंद व्यक्त करत सांगितले की, सादरीकरण करताना आम्हाला जो आनंद मिळाला, तोच आनंद रसिकांनाही नक्की मिळेल. ‘जब्राट’ चित्रपटाचे निर्माते अनिल अरोड़ा, गोविंद मोदी आणि प्रगती कोळगे असून छायांकनाची जबाबदारी अनिकेत खंडागळे यांनी सांभाळली आहे. वेशभूषा युगेशा ओमकार यांची असून चित्रपटातील गाण्यांना बेला शेंडे, आर्या आंबेकर, वैशाली माडे, नंदेश उमप यांसारख्या नामांकित गायकांचा स्वरसाज लाभला आहे.

एकंदरीत, ‘जब्राट’मधील हिंदवी पाटील आणि सुरेखा कुडची यांची लावणी ही चित्रपटाची खास आकर्षण ठरणार असून महाराष्ट्राच्या लोककलेचा जल्लोष मोठ्या पडद्यावर पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Metro: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! नववर्ष सेलिब्रेशनसाठी मेट्रो रात्रभर धावणार; कसं असेल वेळापत्रक

ऐन निवडणुकीत भाजपला मोठा धक्का; मुंबईतील बड्या नेत्यांचा कार्यकर्त्यांसह पक्षाला रामराम

Maharashtra Live News Update: पुण्यात शिवसेना आणि दोन्ही राष्ट्रवादीचा नवीन पॅटर्न? शिवसेनेचा २५ ते ३० जागांचा प्रस्ताव

Lucky Zodiac Sign: पंचांक योगामुळे 'या' चार राशींचे येणार अच्छे दिन, आयुष्याला मिळणार नवी कलाटणी; २०२६ मधील पहिला योग कधी तयार होणार?

संशयाचं भूत डोक्यात घुसलं अन् सुखी संसाराची राखरांगोळी झाली, बायकोसह ४ वर्षाच्या चिमुकल्याचा घेतला जीव

SCROLL FOR NEXT