kaarina kaisar death :  Saam tv
मनोरंजन बातम्या

प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, वयाच्या ३० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, मनोरंजनसृष्टी शोकसागरात

kaarina kaisar death : प्रसिद्ध अभिनेत्री करीनाचं निधन झालं. तिने वयाच्या ३० व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

Vishal Gangurde

प्रसिद्ध अभिनेत्री करीना कायसरचं निधन

करीना कायसरच्या निधनाने चाहत्यांना बसला मोठा धक्का

करीनाच्या वडिलांनी सोशल मीडियावर पोस्ट करून दिली माहिती

प्रसिद्ध कंटेट क्रिएटर आणि प्रसिद्ध अभिनेत्री करीना कायसरचं निधन झालं आहे. करीनाने शुक्रवारी रात्री चेन्नईच्या वेल्लोर येथील रुग्णालयात वयाच्या ३० व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून करीना यकृताशी संबंधित आजाराने त्रस्त होती. करीनाचे वडील माजी राष्ट्रीय मोहम्मद कायसर हमीद यांनी शनिवारी सायंकाळी मुलीच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत माहिती दिली.

करीना कायसरचे पती मोहम्मद यांच्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी करीनाला अचानक ताप आला. त्यानंतर यकृताशी संबंधित आजार बळावला. या गंभीर समस्याने करीना त्रस्त होती. डॉक्टरांनी सांगितलं की, हेपिटाइटिस 'ए' आणि 'ई'च्या संसर्गामुळे यकृतावर परिणाम झाला होता. तिची तब्येतही बिघडली होती. तिला बांगलादेशमधील ढाकाच्या एका खासगी रुग्णालयात दाखल केलं. रुग्णालयात दाखल केल्यानंतर काही दिवसांनंतर प्रकृती आणखी बिघडली. त्यानंतर तिला लाइफ सपोर्टवर ठेवण्यात आलं'.

काही दिवसांनी तिला चांगल्या उपचारासाठी विमानाने सोमवारी ११ मे रोजी रात्री चेन्नईला हलवण्यात आलं. वेल्लोर येथील प्रसिद्ध ख्रिश्चन मेडिकल कॉलेज रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू होते. डॉक्टरांनी आधी तिच्या फुफ्फुसाच्या संसर्गावर उपचार करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर यकृत प्रत्यारोपणाची तयारी करत होते. परंतु सर्व प्रयत्न फोल ठरले. अभिनेत्रीचे १५ मे रोजी निधन झालं.

करीनाचे वडील मोहम्मद कायसर हमीद यांनी सांगितलं की, 'सर्वांना कळवताना दु:ख होत आहे की, माझी लाडकी मुलगी करीना कायसरचं चेन्नईत उपचारादरम्यान निधन झालं. माझ्या मुलीने कोणती चूक केली असेल, कोणाला दुखावले असेल, तर तिला माफ करावे. कठीण काळात साथ देणाऱ्यांचे आभार व्यक्त करतो'.

कोण आहे करीना कायसर?

बांगलादेशात सोशल मीडियावर कंटेट क्रिएटर म्हणून करीना प्रसिद्ध होती. तिने अनेक मालिकांमध्ये सहकलाकार म्हणूनही काम केलं होतं. करीनाच्या मृत्यूने तिच्या सहकलाकार आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : अहमदपूर नागठाणा बस मार्गावर बस उलटली, बस मधील सात ते आठ प्रवासी गंभीर जखमी

Mrunal Thakur: मृणाल ठाकूरचा ग्लॅमरस अंदाज...

Ederson: भयंकर! गेल्या ८ वर्षांपासून एकच अंडरवेअर घालून खेळतोय फुटबॉल स्टार; कारण ऐकून धक्का बसेल

अॅसिडीटी आणि उष्णता होईल झटक्यात कमी, उन्हाळ्यात एक ग्लास प्या थंडगार मठ्ठा, घरी बनवण्याची पद्धतही सोपी

सोन्या-चांदीचे भाव गगनाला; केंद्र सरकारच्या एका निर्णयामुळे बाजारावर मोठा परिणाम, कारण काय?

SCROLL FOR NEXT