Poonam Pandey Saam Tv
मनोरंजन बातम्या

Poonam Pandey: पूनम पांडे दिसणार मंदोदरीच्या भूमिकेत; भाजप अन् विश्व हिंदू परिषदेचा विरोध, केली मोठी मागणी

Poonam Pandey Role: दिल्लीतील लव कुश रामलीलामध्ये अभिनेत्री पूनम पांडे मंदोदरीची भूमिका साकारणार आहे. भाजप आणि विश्व हिंदू परिषदेकडून यावर आक्षेप घेण्यात आला आहे.

Manasvi Choudhary

दिल्लीच्या रामलीला सादरीकरणात अभिनेत्री पूनम पांडे मंदोदरीची भूमिका साकारणार आहे. रामलीला समितीच्या आयोजकांनी पूनम पांडेची निवड केली आहे. रावणाची पत्नी मंदोदरीची भूमिका अभिनेत्री पूनम पांडे साकारणार असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. भाजप आणि विश्व हिंदू परिषदेने अभिनेत्री पूनम पांडेच्या भूमिकेवर आक्षेप घेतला आहे. त्यांनी समितीला पूनम पांडेच्या जागी दुसऱ्या अभिनेत्रीची मागणी केली आहे.

भाजप आणि विश्व हिंदू परिषदेने दिल्ली रामलीला समितीला पत्र पाठवले आहे. पत्रामध्ये त्यांनी, लव कुश रामलीला ही देशभरात ओळखली जाते. ज्यामध्ये मोठ्या संख्येने भाविक, लोक सहभागी असतात. 'अभिनेत्री पांडे गेल्या अनेक वर्षापासून छोट्या पडद्यापासून दूर आहे. तर सोशल मीडियावर देखील अभिनेत्री तिच्या फोटो आणि व्हिडीओमुळे वादात असते. असे पत्रात म्हटलं आहे.' माहितीनुसार, पूनम पांडेची भूमिका 29,30 सप्टेंबर रोजी होणार असून आयोजक यावर चर्चा करून निर्णय घेतील असं लव कुश रामलीला समितीचे अध्यक्षांनी म्हटलं आहे.

नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजेच आजपासून १ ऑक्टोबरपर्यंत दिल्लीत भव्य रामलीला सादरीकरण सुरू आहे. यामध्ये सेलिब्रिटींचाही सहभाग आहे. दिल्लीच्या प्रसिद्ध लाल किल्ला मैदानावर लव कुश रामलीला होणार आहे. जी सर्वात लोकप्रिय रामलीलांपैकी एक आहे. लव कुश रामलीलामध्ये, चित्रपट अभिनेता किंशुक वैद्य भगवान श्री रामची भूमिका साकारणार आहे. डॉ. राजन शर्मा लक्ष्मणची भूमिका साकारणार आहे. अभिनेत्री रिनी आर्य माता सीतेची भूमिका साकारणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Drought : शेतकऱ्यांकडून कर्जवसुली नाही, नवीन बांधकामांवर निर्बंध; राज्य सरकारचे मोठे निर्णय

Chanakya Niti : बायकोने नवऱ्याला न विचारता चुकूनही करू नयेत ‘या’ ४ गोष्टी; नाहीतर नात्यात येईल दुरावा

Housing Society : सोसायटी भाडेकरूला अचानक फ्लॅटमधून बाहेर काढू शकते का? भाडेकरार करताना या ४ गोष्टी तपासून घ्यायला हव्यात

CISF कॅम्पमध्ये अंदाधुंद गोळीबार; एका बड्या अधिकाऱ्यासह ४ जवानांचा मृत्यू, धक्कादायक कारण उघड

Maharashtra News Live Update: प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकरांचे वडिलांच्या घरावर ACBचा छापा

SCROLL FOR NEXT