Poonam Pandey Bold Look  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Poonam Pandey: पूनम पांडे 'भयंकर' अवतारात पार्टीत आली, प्रेमाचा 'नशा' काही उतरेना!

पूनम पांडे दिव्या अग्रवालच्या वाढदिवसाच्या पार्टीला गेली होती.

Pooja Dange

Poonam Pandey Bold Outfit: अभिनेत्री पूनम पांडेमध्ये तिच्या स्टाईलने अनेकांना मदहोश करत असते. पूनमला पाहताना लोक दंग होतात. पूनमने तिच्या बोल्ड आणि हॉट लूकने सर्वांचे मन जिंकले आहे. पूनमने पुन्हा एकदा तिच्या स्टाईलने चाहत्यांना घायाळ केले आहे. पूनम पांडे दिव्या अग्रवालच्या वाढदिवसाच्या पार्टीला गेली होती. पार्टीतील तिच्या लूकची सर्वत्र चर्चा होत आहे.

पूनम पांडेचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये पूनम खूपच हॉट दिसत आहे. पीच रंगाची ब्रॅलेट आणि ऑरेंज रंगाच्या ट्रॅक पॅन्टमध्ये पूनम गाडीतून उतरली. ती गाडीतून उतरताच सगळ्यांच्या नजरा तिच्यावर खिळल्या होत्या. तिचा बोल्डनेस पाहून सर्वजण तिच्याकडे पाहत राहिले. तिचा हा लूक आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. (Viral Video)

पूनमच्या व्हिडिओवर चाहते अनेक कमेंट करत आहेत. एका नेटकाऱ्याने लिहिले आहे की, 'आजकाल काहीही व्हायरल होते'. त्याच पूनमच्या चाहत्याने त्याला उत्तर देत लिहिले आहे की, 'जो पूनम से जले साइड से चले'.

पूनम पांडे सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. सोशल मीडियावर अनेकदा तिच्या बोल्ड व्हिडिओ आणि फोटोंची चर्चा होत असतो. तिने एखादी पोस्ट शेअर करताच ती काही वेळातच व्हायरल होते. (Social Media)

पूनमची तरुणांमध्ये खूप क्रेझ आहे. 31 वर्षांच्या पूनम पांडेने 2013 मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. 'नशा' हा तिचा पहिला बॉलिवूड चित्रपट होता. या चित्रपटातील तिची व्यक्तिरेखाही खूप बोल्ड आणि ग्लॅमरस होती. मॉडेलिंग करून पूनमने तिच्या करिअरची सुरुवात केली होती. पूनम पांडेने 2011 च्या क्रिकेट विश्वचषकादरम्यान भारताने जिंकल्यास ती टॉपलेस होईल असे जाहीर केले होते. त्यामुळे तेव्हा ती चर्चेत आली होती. (Actress)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुंबई इंडियन्सच्या संघात होणार मोठा बदल; कोण बनणार MIचा पुढचा कर्णधार? 'या' खेळाडूंच्या नावाची जोरदार चर्चा

Maharashtra News Live Update: पाच हजार रुपयांची मदत म्हणजे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणं- नाना पटोलेंचा सरकारवर घणाघात

किचनमधील भांड्यांचा तुमच्या आरोग्यावर कसा होतो परिणाम? जाणून घ्या

रात्री नुडल्स खाऊन कुटंब झोपलं अन्....; ५ जणांच्या मृत्यू प्रकरणात मोठा ट्विस्ट

Monday Horoscope: या 5 राशींचं नशीब पालटणार? अचानक पडणार पैशांचा पाऊस

SCROLL FOR NEXT