Ponniyin Selvan OTT Release: दिग्दर्शक मणिरत्नम हे त्यांच्या ऐतिहासिक चित्रपटांसाठी ओळखले जातात. मणिरत्नम यांनी दिग्दर्शित केलेला पोन्नियन सेल्वनने बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला जमवला आहे. प्रदर्शित झालेल्या सगळ्याच भाषांमध्ये या चित्रपटाने उत्तम कामगिरी केली आहे. चित्रपटगृहांमध्ये धमाका केल्यानंतर हा चित्रपट आता ओटीटीवर येण्यासाठी सज्ज झाला आहे. ज्यांना ज्यांना हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये पाहता आला नाही त्यांना आता घरबसल्या या चित्रपटाचा आनंद घेता येणार आहे.
चोळ साम्राज्याचा गौरवशाली इतिहास पोन्नियान सेल्वनमध्ये दाखविण्यात आला आहे. गौरवशाली इतिहासाचा साक्षीदार 'पोन्नियान सेल्वन 1' आता अमेझॉन प्राइम व्हिडिओवर उपलब्ध आहे, हा चित्रपट सध्या तमिळ, तेलुगु, मल्याळम आणि कन्नडमध्ये प्रसारित केला जात आहे. अद्याप हा चित्रपट हिंदीमध्ये ओटीटीवर प्रदर्शित झालेला नाही. परंतु पोन्नियान सेल्वन पाहण्यासाठी तुम्हाला आता 199 रुपये मोजावे लागणार आहेत.
'पोन्नियान सेल्वन 1' नुकताच 'अमेझॉन प्राईम रेंटल' प्रदर्शित झाला आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मने जाहीर केले आहे की 'पोन्नियान सेल्वन 1' सर्व अमेझॉन प्राइम सदस्यांसाठी 4 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होईल. ''पोन्नियान सेल्वन 1' ने जगभरात 480 कोटी रुपयांची कमाई केली असून लवकरच हा चित्रपट 500 कोटींचा टप्पा पार करेल अशी अपेक्षा आहे. पोन्नियिन सेल्वन 1 ने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 250 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. (OTT)
'पोन्नियान सेल्वन 1' 30 सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होऊन एक महिन्यानंतर हा चित्रपट ओटीटीवर येत आहे. चित्रपटगृहांमध्ये नफा मिळविल्यानंतर निर्माते आता ओटीटीच्या माध्यमातूनही कमाई करू पाहत आहेत. 'पोन्नियान सेल्वन 1'मध्ये विक्रम, कार्ती, ऐश्वर्या राय बच्चन, ऐश्वर्या लक्ष्मी, जयम रवी, त्रिशा, प्रकाश राज, पार्थिवन असे अनेक कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. (Movie)
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.