Na Dho Mahanor Passes Away  Facebook
मनोरंजन बातम्या

Na Dho Mahanor Death: निसर्गाचे सौंदर्य शब्दातून समृद्ध करणारा कवी हरपला; ज्येष्ठ साहित्यिक ना. धों. महानोर यांचे निधन

Na Dho Mahanor Died : वयाच्या ८१ व्या वर्षी ना. धो. महानोर यांचे निधन झाले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Na Dho Mahanor Passes Away : ज्येष्ठ साहित्यिक आणि कवी ना. धो. महानोर यांचे निधन झाले. पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये सकाळी साडेआठ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

वयाच्या ८१ व्या वर्षी ना. धों. महानोर यांचे निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी असून ते व्हेंटीलेटरवर होते. ते किडनीच्या आजाराने त्रस्त होते. उद्या म्हणजे शुक्रवारी पळसखेड येथे त्यांच्या गावी दुपारी ४ वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्वीट करत ना. धों. महानोर यांना श्रद्धांजली वाहिली आहे. सुप्रिया सुळे यांनी ट्वीट करत लिहिले आहे की, ज्येष्ठ कवी ना. धों. महानोर यांचे निधन झाले. ही आम्हा सर्वांसाठी व्यक्तिगत हानी आहे. महानोरांनी खऱ्या अर्थाने मराठी साहित्यात बालकवी आणि बहिणाबाई यांचा समृद्ध वारसा जीवंत ठेवला.

कवितेतून माती, शेती आणि संस्कृतीची नवी ओळख करून दिली. त्यांच्या ‘पानझड’, ‘तिची कहाणी' ‘रानातल्या कवितां' आदी अनेक रचना अजरामर आहेत. त्यांनी यशवंतराव चव्हाण सेंटरचे विश्वस्त म्हणून देखील काम पाहिले. त्यांच्या निधनामुळे साहित्याला मातीशी जोडून ठेवणारा साहित्यिक काळाच्या पडद्याआड गेला. या कठीण प्रसंगी आम्ही सर्वजण महानोर कुटुंबियांसोबत आहोत. भावपूर्ण श्रद्धांजली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : आज ठाकरे बंधू यांची जाहीर सभा शिवाजी पार्कवर होणार

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींना मकरसंक्रातीला खुशखबर मिळणार? खात्यात ₹३००० येण्याची शक्यता

Rare Raj Yoga 2026: 24 वर्षांनंतर या राशींचं चमकणार भाग्य; बुधादित्यसह बनणार ३ दुर्लभ राजयोग, प्रेम जीवनात येणार आनंद

Vasai-Virar Politics: वसई-विरारचा 'गड' राखण्यासाठी ठाकूर-गावडे युती, भाजपच्या 'चक्रव्यूह' भेदणार का?

Firing In America: अमेरिकेतील मिसिसिपीमध्ये अंदाधुंद गोळीबार; ६ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT