Garba Song Released Saam Tv
मनोरंजन बातम्या

Garba Song Released: PM नरेंद्र मोदींनी लिहिलं गरब्याचं गाणं; नवरात्रीआधीच म्युझिक व्हिडिओ प्रदर्शित, एकदा पाहाच!

Garba Song Shared On Social Media: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहिलेला गरबा नुकताच सोशल मीडियावर प्रदर्शित झाला आहे.

Chetan Bodke

Garba Song

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमीच आपल्या कौशल्यामुळे नागरिकांमध्ये चर्चेत असतात. सध्या पंतप्रधान मोदी एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहेत. त्यांनी लिहिलेलं एक गाणं नुकतंच सोशल मीडियावर प्रदर्शित झाले आहे. नवरात्रीचे औचित्य साधून त्या गाण्याचे प्रदर्शन करण्यात आले आहे. पंतप्रधानांनी लिहिलेल्या गाण्याची सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चा होत आहे. गाण्यामध्ये आपल्याला गुजरातच्या संस्कृतीचा अभिमान आणि वारसा या गाण्यातून पाहायला मिळत आहे.

गाण्याची निर्मिती जॅकी भगनानी यांनी केली असून गाण्याला ध्वनी भानुशालीने आपला गोड आवाज दिला आहे. हे गाणे नुकतंच युट्यूबवर प्रदर्शित झाले असून गाण्याला प्रेक्षकांकडून भरघोस प्रतिसाद मिळत आहे. हे गाणं शेअर करताना युट्यूबने लिहिले होते की, “पीएम मोदींनी लिहिलेल्या गाण्यासोबत ‘गारबो’मध्ये पहिल्यांदाच तनिष्क बागचीचे सूर आणि ध्वनी भानुशालीच्या आवाजाची जादू प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. नदीम शाह दिग्दर्शित गाण्यासोबत सर्वांनीच आनंद घ्या.”

पंतप्रधानांनी लिहिलेले हे गाणं नवरात्रीच्या सणाविषयी माहिती देते, यामध्ये, विविध राज्यातल्या लोकांना आपआपली संस्कृती आणि परंपरा आत्मसात करून एकत्र आणते. सोबतच, ‘गारबो’ गाण्याच्या माध्यमातून नवरात्रीचा आनंद आणि सणातील चैतन्य आपल्याला पाहायला मिळत आहे.

“पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या म्युझिक प्रोजेक्टचा भाग असणे हा माझ्यासाठी आणि जेजस्ट म्युझिकसाठी खूप अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण आहे.” असे जॅकी भगवानीने ‘गारबो’ गाण्याबद्दल सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गाण्याचा व्हिडीओ अशा प्रकारे तयार करून रिलीज करण्याची ही पहिलीच वेळ आहे. या गाण्याला अवघ्या काही तासांतच ७ लाख २० हजार इतके व्ह्यूज मिळाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सोलापुरात अवकाळी पावसाची जोरदार हजेरी

Weather Update: पुढील ३ दिवस पावसाचे; दक्षिण महाराष्ट्रासह विदर्भात पाऊस पडणार, 'या' जिल्ह्यांना हवामान विभागाचा अलर्ट

Girls Shirt Style: जिन्सवर ट्राय करा हे ७ ट्रेंडी लेटेस्ट शर्ट; ऑफिस किंवा कॉलेजमध्ये दिलास सगळ्यात ग्लॅमरस

Mumbai Tourism: मुंबईकरांसाठी खुशखबर! 'गंगा आरती'चा दिव्य अनुभव घ्यायचाय? तर 'या' २ ठिकाणांना नक्कीच भेट द्या

Dog Abuse Case : विकृतीचा कळस! तरुणाचा कुत्रीवर बलात्कार, आरोपीच्या तोंडाला काळं फासलं, चपलांचा हार घालून धिंड काढली

SCROLL FOR NEXT