Compass Muhurt
Compass Muhurt Intagram/ @planetmarathiott
मनोरंजन बातम्या

Compass Marathi Web Series: प्लॅनेट मराठीने दिले चाहत्यांना खास गिफ्ट, मल्टिस्टारर वेबसीरीजच्या चित्रीकरणाला सुरुवात...

Chetan Bodke

Compass Marathi Web Series: २०२२ मध्ये 'प्लॅनेट मराठी'ने उत्तमोत्तम, सर्जनशील आशय देत आपल्या प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले. दर्जेदार,राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त चित्रपट, लघुपट, सर्वाधिक पाहिल्या गेलेल्या वेबसीरिज असा मनोरंजनाचा सर्वोत्कृष्ट खजिना दिल्यानंतर या वर्षात नवीन आशय घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास प्लॅनेट मराठी सज्ज झाले आहे. या वर्षाची सुरुवात प्लॅनेट मराठी सुश्रुत भागवत दिग्दर्शित 'कंपास' या वेबसीरिजने करणार आहे.

नुकताच या वेबसीरिजचा मुहूर्त सोहळा मुंबईत पार पडला. यावेळी उर्मिला कोठारे, सायली संजीव, ऋतुजा बागवे, पौर्णिमा डे, खुशबू तावडे, सुयश टिळक, संग्राम साळवी, सौरभ गोखले, धवल पोकळे, राजेंद्र शिसतकर, गिरीश जोशी, आनंद इंगळे, संजय मोने यांच्यासह निर्माते अक्षय बर्दापूरकर आणि संतोष रत्नाकर गुजराथी उपस्थित होते.

प्लॅनेट मराठीचे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, " मागील वर्ष आमच्यासाठी खूप खास होते. प्रेक्षकांच्या आवडीनिवडी विचारात घेत आम्ही प्रेक्षकांसाठी मनोरंजनात्मक आशय देत ते सर्व प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले. २०२३ या वर्षाची सुरुवात आम्ही 'कंपास' या वेबसीरिजच्या चित्रीकरणाने करत आहोत."

"येत्या काळात आम्ही अनेक काल्पनिक, अकल्पनिय चित्रपट, वेबसीरिज, लघुकथा घेऊन भेटीला येऊ. 'कंपास' हा खूप वेगळा विषय असून यात कसलेल्या कलाकारांची दमदार फळी आहे. 'कंपास' हे नावाच खूप वेगळं असून यात प्रेक्षकांना काहीतरी जबरदस्त क्राईम थ्रिलर पाहायला मिळणार आहे."

दिग्दर्शक सुश्रुत भागवत म्हणतात, " नवीन वर्षात प्लॅनेट मराठी सोबत नव्यानं पुन्हा एकदा काम करण्याची संधी मिळणे, ही खूपच आनंदाची बाब आहे. 'कंपास' ही एक क्राईम थ्रिलर वेबसीरिज आहे, यापेक्षा अधिक मी काहीही सांगणार नाही, हां एवढं मात्र नक्की की अशी वेबसीरीज या आधी मराठीत तुम्ही कधीही पाहिली नसेल."

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Food for Diabeties : मधुमेहाचे रुग्ण करु शकतात 'या' गोड पदार्थांच सेवन

Acidity Problem : उन्हाळ्यात सतत अ‍ॅसिडीटीचा त्रास होतोय? हे ड्रिंक प्या

Today's Marathi News Live : नागपूरनंतर गोव्यातील विमानतळ बॉम्बने उडवून देण्याची धमकी

Tejasvee Ghosalkar News | तेजस्वी घोसाळकरांचा निवडणूक लढण्यास नकार, काँग्रेसचा उमेदवार कोण?

T20 World Cup 2024: वर्ल्डकपआधी पाकिस्तान संघात मोठा बदल! टीम इंडियाला चॅम्पियन बनवणाऱ्या दिग्गजाचा संघात समावेश

SCROLL FOR NEXT