Pathaan Controversy  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Pathaan Controversy: 'रंगावरुन गोंधळ घालणे योग्य नाही' म्हणत भोजपूरी अभिनेत्रीने केली नाराजी व्यक्त...

'बेशरम रंग' या गाण्यातील दीपिकाच्या भगव्या रंगाच्या बिकीनीला सर्वच स्तरातून विरोध होत आहे. तर काही जणांकडून या गाण्यासह चित्रपटाचे समर्थन केले जात आहे.

Chetan Bodke

Pathaan Controversy: सध्या दीपिका आणि शाहरुखचे 'बेशरम रंग' हे गाणं नेटकऱ्यांनी चांगलेच ट्रोल केले आहे. 'बेशरम रंग' या गाण्यातील दीपिकाच्या भगव्या रंगाच्या बिकीनीला सर्वच स्तरातून विरोध होत आहे. तर काही जणांकडून या गाण्यासह चित्रपटाचे समर्थन केले जात आहे. यावर बऱ्याच कलाकारांनी तर काही राजकीय नेत्यांनीही आपले परखड मत मांडले आहे. त्याच पार्श्वभूमीवर भोजपूरी अभिनेत्री राणी चॅटर्जीनीही 'बेशरम रंग'या गाण्यावर आपले मत मांडले आहे.

या गाण्यावर आपले मत मांडताना भोजपूरी अभिनेत्री राणी चॅटर्जी म्हणते, "कोणत्याही रंगावरून गोंधळ घालणे योग्य नाही, हे कृत्य फारच चुकीचे आहे. विचार करून रंग घालता येत नाही. दीपिकाने यापूर्वीही या रंगाचे कपडे अनेकदा परिधान केले आहेत. दीपिकाने 'ओम शांती ओम'मध्ये या रंगाचा आउटफिट परिधान केला होता. मुमताजनेही भगव्या रंगाची साडी नेसली होती."

सोबतच ती पुढे असेही म्हणते, " मी देखील भगवा रंग परिधान केला असून त्यावर पावसातील एक गाणंही शुट केलं होतं. माधुरीनेही भगव्या रंगाची साडी परिधान केली आहे. मग त्यांच्यावर वाद का झाला नाही? सध्या लोकांना जास्त काही कामं नाहीत. चित्रपट आणि गाणी हे फक्त मनोरंजनासाठीच पहावे. यावर बहिष्कार का टाकायचा? सध्याची तरुण पिढी सनी लियोनला पाहात नाही का? नोरा फतेहीनेही तिच्या गाण्यांमध्ये कोणत्या रंगाची साडी परिधान केली आहे?"

"या सर्व फार सक्तीच्या गोष्टी आहेत. ज्यांना प्रत्येक चित्रपटावर बहिष्कार टाकायचा आहेत त्यांना चित्रपटाच्या नकारात्मकतेचा प्रचार करत चांगल्या गोष्टी कधीच घडवायच्या नाहीत. सध्याची पिढी हेच कपडे घालून समाजात वावरत आहे. अवॉर्ड फंक्शनमध्ये बऱ्याच अभिनेत्रींनी हेच कपडे घालत हजेरी लावली आहे. शाहरुखने आपले सर्व आयुष्य चित्रपटसृष्टीसाठी दिले आहे. त्याच्या बऱ्याच चित्रपटातून त्याने अनेक सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला असल्याने त्याच्या सोबत तरी लोकांनी असे वागू नये." असे स्पष्ट मत भोजपूरी अभिनेत्री राणी चॅटर्जीने व्यक्त केले आहे.

'पठान' ला विरोध होण्यासाठी सुरुवात

'पठान' चित्रपटातील 'बेशरम रंग' गाणं 12 डिसेंबरला प्रदर्शित होताच सोशल मीडियावर बरेच व्हायरल झाले होते. नेटकरी एका बाजूला गाण्यावर रिल्स बनवत आहेत तर दुसऱ्या बाजूला दीपिकाला बिकीनीवरुन ट्रोल्स केले जात आहे. 'पठान'बद्दल आजवर राजकीय नेत्यांपासून अभिनेत्यांपर्यंत बरेच राजकीय नेते बोलले आहेत. अद्याप 'पठान'च्या वादावर निर्माते, शाहरुख खान किंवा दीपिका पदुकोण यांच्याकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weekly Horoscope: काहींना कामात यश मिळेल तर काहींना प्रवास जपून करावा लागेल, पाहा साप्ताहिक राशीभविष्य

Nishikant Dubey Anti-Marathi : मराठी माणसाला डिवचा, प्रसिद्धी मिळवा; लालू, अमरसिंहनंतर आला निशिकांत दुबे

Pakistan : पाकिस्तानात होणार सत्तापालट? असीम मुनीर होणार राष्ट्रपती? बिलावल भुट्टोच्या विधानामुळे खळबळ

Russia News : पुतिन यांनी मंत्रिमडळातून काढलं; काही तासांतच मंत्र्याने आयुष्य संपवलं, जगात खळबळ

Shravan Somvar: पहिल्या श्रावण सोमवारी करा 'असे' उपाय, महादेव होतील प्रसन्न

SCROLL FOR NEXT