Pathaan 16th day collection Saam Tv
मनोरंजन बातम्या

Pathan Collection: बॉक्स ऑफिसवर फक्त 'पठान'ची हवा, लवकरच पार करणार १००० कोटींचा टप्पा

१६ व्या दिवशी 'पठान'ची शानदार कमाई.

Pooja Dange

Pathan 16th Day Box Office Collection: 'पठान' चित्रपटाने भारतासह जगभरात धुमाकूळ घातला आहे. चित्रपटाची कमाई दिवसेंदिवस वाढतच आहे. 'पठान' चित्रपटाला प्रदर्शित होऊन १६ दिवस झाले आहेत. १६ दिवसानंतर या चित्रपटाने काय किमया केली आहे पाहूया.

यश राज फिल्मनी त्यांचा सोशल मीडियावर पोस्ट करत 'पठान'च्या कमाईची माहिती दिली आहे. 'पठान' चित्रपट बॉक्स ऑफिसवर राज्य करत आहेत असे देखील त्यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे.

यश राज फिल्म्सने शेअर केलेल्या पोस्टमध्ये 'पठान' चित्रपटाने जगभरात ८८८ करोडचा गल्ला जमावल्याचे म्हटले आहे. लवकरच हा चित्रपट १००० कोटींचा टप्पा पार करेल यात शंका नाही. खूप कमी वेळात या चित्रपटाला इतके यश मिळाले आहे.

'पठान' चित्रपटाच्या भारतातील कमाईविषयी बोलायचे झाले तर या चित्रपटाने भारतातच ५५१ करोडचा पल्ला गाठला आहे. येणारा वीकएंड हा या चित्रपटाचा तिसरा वीकेंड आहे. सध्या 'पठान' चित्रपटसह कोणताही चित्रपट नाही. यामुळे चित्रपटाला याच फायदा होत आहे.

'पठान' चित्रपटाचे सर्वच स्तरारून कौतुक होत आहे. काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत चित्रपटाचे कौतुक केले. तर मनसे नेते राज ठाकरे यांनी देखील शाहरुख खान फुलांचा बुके पाठवून त्याचे अभिनंदन केले आहे.

'पठान' चित्रपटासोबतच शाहरुखचा 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' हा चित्रपट देखील प्रदर्शित झाला आहे. दोन्ही चित्रपटही 'राज'ची भूमिका प्रेक्षकांना पाहता येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुरंदरमध्ये बायोगॅसची टाकी स्वच्छ करण्यासाठी गेलेल्या तिघांचा मृत्यू

Face Care: उन्हाळ्यातही तुमचा चेहरा करेल नॅचरल ग्लो; फक्त 'या' फळांचा तुमच्या आहारात करा समावेश

कल्याणमध्ये देशातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी यांचे स्मारक होणार; वास्तूजवळ कोणकोणत्या सुविधा असणार?

UGC कडे तक्रार अन् आयुर्वेद कॉलेजमधील 18 विद्यार्थ्यांचं निलंबन; नेमकं प्रकरण काय?

Maharashtra HSC Result: १२ वीचा निकाल 'Coming Soon'; रिझल्टबाबत नवी अपडेट आली समोर

SCROLL FOR NEXT