Jhoome Jo Pathaan Song  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Pathaan Movie Controversy: शाहरुखचा 'पठाण' पुन्हा अडचणीत! 'झुमे जो पठाण' गाणे चोरल्याचा आरोप

'बेशरम' गाण्याच्या वादानंतर शाहरुख खानचे 'झुमे जो पठाण' गाणेही वादात सापडले असून त्यावर जोरदार टीका होत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Pathaan Movie: बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा 'पठाण' चित्रपट चांगलाच वादात सापडला आहे. काही दिवसांपूर्वी पठाण चित्रपटातील बेशरम गाणे प्रदर्शित झाले होते. या गाण्यामधील दिपिकाच्या बिकीनीवरुन हा वाद सुरू झाला होता. हा वाद सुरू असतानाच चित्रपटातील अलिकडेच प्रदर्शित झालेले दुसरे गाणे चोरी केल्याचा आरोप होत आहे.

त्यामुळे 'बेशरम' गाण्याच्या वादानंतर शाहरुख खानचे 'झुमे जो पठाण' गाणेही वादात सापडले असून त्यावर जोरदार टीका होत आहे.

अभिनेता शाहरुख खान (Shahrukh Khan) आणि दीपिका पदुकोणचा पठाण चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. चित्रपटातील बेशरम गाण्यावर हिंदूत्ववादी संघटनांनी आक्षेप घेतला होता. या गाण्याचे बोल आणि दीपिकाच्या बिकीनीमुळे भगव्या रंगाचा अपमान झाल्याचा आरोप हिंदू महासभेने घेतला होता. हा वाद सुरू असतानाच चित्रपटातील झुमे जो पठाण गाणे चोरीचे असल्याचा आरोप होत आहे.

नुकतेच 'पठाण' चित्रपटातील 'झुमे जो पठाण' हे गाणे प्रदर्शित झाले होते. गाण्यात शाहरुख खान आणि दीपिकाची जोरदार केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. गाण्याला प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद मिळत असतानाच हे गाणे चोरीचे असल्याचा आरोप होत आहे.

एका दिवसापूर्वी प्रदर्शित झालेले हे गाणे आत्तापर्यंत ९ मिलीयन लोकांनी पाहिले आहे. मात्र सोशल मीडिया कंपोजर विशाल आणि शेखरने या गाण्यावर धून चोरल्याचा आरोप केला आहे. त्यांनी झुमे जो पठाण या गाण्याची धून अर्जुन द वॉरिअर्स प्रिंस या चित्रपटातील कर्म का तलवार या गाण्यातून चोरल्याचे म्हणले आहे. त्यामुळे बेशरम रंग नंतर शाहरुखचे हे गाणेही वादात सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (Bollywood)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

District Bank Elections: राज्यात जिल्हा बँक निवडणुकीचा धुरळा; बिनविरोध निवडणुकीसाठी नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

सर्वोच्च न्यायालयाचा सहकार सम्राटांना मोठा धक्का; 10 वर्ष पूर्ण केलेल्या संचालकांना निवडणुकीत बंदी

Maharashtra MLC Elections: महायुतीत कुठे दिलजमाई, कुठे बंडखोरी कायम; 5 मतदारसंघात कुणामध्ये रंगणार लढत?

Dengue Fever : डेंग्यूचा सर्वाधिक धोका कोणाला? रुग्णसंख्या वाढण्यामागची कारणे

NCP Corporator Disqualified: शरद पवार गटाला मोठा धक्का! राष्ट्रवादीच्या नगरसेविकेचं पद रद्द; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT