Pathaan Box Office Collection Saam Tv
मनोरंजन बातम्या

Pathaan Box Office Collection Day 18: शाहरुखच्या 'पठान'चा बॉक्स ऑफिसवर जलवा कायम, लवकरच पार करणार १००० कोटींचा गल्ला...

शाहरुख आणि दीपिकाचा 'पठान'चित्रपटाने तीन आठवड्यात बॉक्स ऑफिसवर प्रचंड धुमाकूळ घातला आहे.

Chetan Bodke

Pathaan Box Office Collection Day 18: शाहरुख आणि दीपिकाचा 'पठान'चित्रपटाने तीन आठवड्यात बॉक्स ऑफिसवर प्रचंड धुमाकूळ घातला आहे. दिवसेंदिवस चित्रपट आपला नवा विक्रम रचत बॉक्स ऑफिसवर कोटीच्या कोटी उड्डाणे घेत आहे. भारतातच नाही तर परदेशातही 'पठान'चित्रपटाने यशस्वी कामगिरी केली. परंतू खूप कमी दिवसातच चित्रपटाने जगभरात यशस्वी कामगिरी केली आहे. चित्रपटाला प्रदर्शित होऊन तब्बल १८ दिवस पुर्ण झाले आहे.

१८ दिवसात चित्रपटाने जगभरात एकूण ९३० कोटींचा गल्ला कमावला होता, तर देशात चित्रपटाने ५७२ कोटींची कमाई केली होती. गेल्या वर्षात बॉलिवूडचे अनेक चित्रपट सतत फ्लॉप होत होते. पण 'पठान'चित्रपट प्रदर्शित होताच बॉलिवूडला या चित्रपटाने एक नवी उर्जा आणि उमेद दिली होती. १८ व्या दिवशी चित्रपटाने भारतात १०.७५ कोटींची कमाई केली होती. सर्वाधिक कमाई करण्याचा मान सध्या 'पठान'चित्रपटालाच मिळत आहे.

तिसऱ्या आठवड्यातील शुक्रवारी चित्रपटाने ५.९० कोटींची कमाई केली असून शनिवारी १०. ७५कोटींची कमाई केली होती. 'पठान' चित्रपट २५ जानेवारीला भारतासह जगभरात प्रदर्शित झाला होता. चित्रपटात मुख्य भूमिकेत शाहरुख खान, दिपीका पादुकोण, जॉन अब्राहम, डिंपल कपाडिया आणि आशुतोष राणा मुख्य भूमिकेत आहे. तर सलमान खान पाहुणा कलाकार म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chandrapur Politics: वडेट्टीवार आणि धानोरकर वाद शिगेला,18 नगरसेवक दिल्लीला; महापौरपदाबाबत अंतिम निर्णय घेणार राहुल गांधी?

Wednesday Horoscope : काही तरी मोठं घबाड हाती लागणार; ५ राशींच्या लोकांचं नशीब सुसाट धावणार

Maharashtra Live News Update: धाम नदीपात्रात अजित पवारांच्या अस्थीचे विसर्जन

कोण राज ठाकरे- वाकरे...; राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरील टीकेनंतर प्रफुल पटेल भडकले, VIDEO

Valentine's Day Gifts: व्हॅलेंटाईन डे करा स्पेशल यावेळी तुमच्या बॉयफ्रेंड किंवा नवऱ्याला द्या या युनिक गिफ्ट्स

SCROLL FOR NEXT