PassOut Short Film Saam Tv
मनोरंजन बातम्या

Pass Out Short Film: महाराष्ट्रासह सातासमुद्रापार मराठी लघुपटाचा डंका, आंतरराष्ट्रीय महोत्सवात पटकावले प्रथम पारितोषिक

गेल्या अनेक महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय महोत्सवात प्रथम पारितोषिकाने पटकावत या लघुपटाने सर्वत्र चांगलीच बाजी मारली.

Chetan Bodke

Pass Out Short Film: 'सैराट' आणि 'मूळशी पॅटर्न' फेम अभिनेते सुरेश विश्वकर्मा आणि त्यांच्या जोडीला अभिनेत्री पायल कबरेची मुख्य भूमिका असलेला आणि दिग्दर्शक राहुल दिलीप सूर्यवंशी दिग्दर्शित 'पास आऊट' या लघुपटाची चर्चा सर्वत्र सुरू आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय महोत्सवात प्रथम पारितोषिकाने पटकावत या लघुपटाने सर्वत्र चांगलीच बाजी मारली.

'पास आऊट' लघुपटाला यंदाच्या मानाच्या नवव्या 'राजस्थान इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल रिफ 2023'च्या फिल्म फेस्टिवलमध्ये या एकमेव मराठी लघुपटाची स्क्रीनिंगसाठी निवड झाली होती. सोबतच या महोत्सवात 'पास आऊट'ला सर्वोत्कृष्ट प्रादेशिक लघुपट हा पुरस्कार देऊन सन्मानितही करण्यात आला.

'रीफ इंटरनॅशनल फ्लिम फेस्टिवल' सोबतच 'इंडियन इंटरनॅशनल फिल्म अवॉर्ड्स', 'गोल्डन स्पॅरो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल टिफ', 'मड हाऊस इंटरनॅशनल शॉर्टफिल्म फेस्टिवल' मध्ये 'पास आऊट' या लघुपटाने प्रथम पारितोषिक पटकावले. त्याचबरोबर मानाच्या अशा युके येथील 'लिफ्ट ऑफ ग्लोबल नेटवर्क सेशन्स' येथे ही 'पास आऊट'ची निवड झाली होती, ही नक्कीच वाखाणण्याजोगी बाब आहे.

'पास आऊट'या लघुपटाची कथा कविता निकम या व्यक्तीवर आधारित आहे. कविता या पात्राने तांत्रिक अभियंता म्हणून शिक्षण पूर्ण केले आहे . तिच्या या करिअरच्या निवडीच्या निर्णयाभोवती ही संपूर्ण कथा फिरतेय. तांत्रिक अभियांत्रिकी ही पुरुषप्रधान व शारिरीक श्रमाची अपेक्षा करणारी फिल्ड असूनही कविता त्यात करिअर घडवण्याच्या हेतूने खडतर मेहनत घेऊन, उत्तीर्ण होत प्रत्यक्ष मुलाखतीला सामोरे जाते.

अशाच एका मुलाखतीतील प्रसंगावर 'पास आऊट' हा लघुपट भाष्य करतो. 'पास आऊट'चे लेखन, संकलन आणि दिग्दर्शनाची धुरा राहुल दिलीप सूर्यवंशी यांनी पेलवली आहे. तर लघुपटाला पार्श्वसंगीत अभिजीत सोनावणे यांनी दिले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nandgaon Accident: महादेवाचं दर्शन घेऊन परताना अपघात; ट्रॅक्टर ट्रॉली २०० फूट खोल दरीत कोसळली

Vice President Election: सी.पी. राधाकृष्णन कोण आहेत? जाणून घ्या राधाकृष्णन यांचा राजकीय प्रवास

Amol Kolhe :...म्हणून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतोय; खासदार अमोल कोल्हेंचा भाजपवर जोरदार प्रहार

Jalna Accident: ट्रकच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर; भीषण अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू

Voter Fraud : खोपोलीतही मतदार याद्यांमध्ये घोळ, 140 मतदारांची नावं यादीत दोन वेळा

SCROLL FOR NEXT