Parineeti Chopra- Raghav Chadha Get Engaged Saam Tv
मनोरंजन बातम्या

Parineeti Chopra- Raghav Chaddha Engaged: काय म्हणता... राघव चड्ढा- परिणीती चोप्राने साखरपुडा उरकला?; लवकरच घेणार सप्तपदी

राघव चड्ढा- परिणीती चोप्रा या दोघांनी ही आधीच गुपचूप साखरपुडा केल्याचं समजलं....

Chetan Bodke

Parineeti Chopra- Raghav Chadha Get Engaged: राघव चड्ढा- परिणीती चोप्रा ही जोडी सध्या सोशल मीडियावर बरीच चर्चेत आहे. गेल्या महिन्याभरापासून त्यांच्या लग्नाच्या अफवांना उधाण आले आहे. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, या दोघांनी ही आधीच गुपचूप साखरपुडा केल्याचं समजलंय. सोबतच, या वर्षी ऑक्टोबर महिन्यात हे दोघे लग्न करणार असल्याचे समजत आहे. गेल्या काही दिवसांपुर्वी आपचे खासदार संजीव अरोरा, पंजाबी गायक-अभिनेता हार्डी संधू यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून या जोडीला शुभेच्छा देखील दिल्या होत्या.

इंडिया टुडेने दिलेल्या माहितीनुसार, राघव चड्ढा- परिणीती चोप्रा यांनी गुपचूप साखरपुडा उरकला आहे. मुख्य माहिती म्हणजे,यांनी गुपचूप साखरपुडा उरकला असून लवकरच लग्नबंधनात देखील अडकणार असल्याची माहिती मिळत आहे. येत्या चार- पाच महिन्यात लग्नगाठ बांधणार असल्याचे सांगितले आहे. परिणीती सध्या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र असल्याने लग्नाची तारीख येत्या चार- पाच महिन्यांत काढली जाण्याची शक्यता आहे.

दोघांनाही कोणतीच लग्नाची घाई नसून सध्या ते आपल्या कामांमध्ये व्यग्र आहेत.लग्नाच्या पुर्वी ही जोडी कामाच्या कमिटमेंट्स व्यस्त आहेत. लग्नापेक्षा कामाला महत्वाचे आहे. अशी प्रतिक्रिया परिणीती- राघव यांनी दिली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, दोघांचेही कुटुंबिय आणि काही जवळच्या नातेवाईकांच्या प्रमुख उपस्थितीत परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या सुपारीचा कार्यक्रम पार पडला.

गेल्या अनेक दिवसांपासून ही जोडी एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा माध्यमांवर होत होती. पत्रकारांनी जेव्हा परिणीतीला त्यांच्या रिलेशनबद्दल विचारले, त्यावेळी तिने कोपरखळी देत उत्तर देण्याचं टाळलं होतं. तर आपचे खासदार राघव चड्ढा यांना विचारले असता, तुम्ही मला राजकारणाबद्दल प्रश्न विचारा, परिणीतीबद्दल विचारू नका… म्हणत त्यांनी रिलेशनच्या चर्चा धुडकावून लावल्या होत्या. (Entertainment News)

सोबतच परिणीतीची चुलत बहिण बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा Jio MAMI फिल्म फेस्टिव्हलसाठी भारतात येणार आहे. अशातच ती राघव- परिणीतीच्या लग्नाला देखील उपस्थित राहण्याची शक्यता सध्या वर्तवली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: भाजपने आधी स्वतःचे संस्कार तपासावेत; खरगे यांच्या विरोधातील आंदोलनावरून काँग्रेसचा सवाल

Kidney Stone: दुखणं थांबलं म्हणजे स्टोन पडला असं वाटतंय? 'ही' चूक महागात पडू शकते

महाराष्ट्र माझ्या हातात सत्ता कधी देतोय, याचीच वाट पाहतोय! राज ठाकरेंचे थेट विधान; नेमकं काय म्हणाले?

HSRP Number Plate : HSRP नंबर प्लेट नसल्यास होणार दंडात्मक कारवाई; वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी

'हा तर शिंदे-फडणवीसांच्या विरोधातील गेम प्लॅन, दिल्लीतून हात असल्याचा संशय'; मनोज जरांगेंचा खळबळजनक दावा

SCROLL FOR NEXT