Manasvi Choudhary
किडनी स्टो ही एक अतिशय वेदनादायी आणि गंभीर समस्या आहे. किडनी स्टोनमध्ये पाठीत आणि पोटामध्ये अनेक वेदना होतात.
ं
परंतु पाठीचे किंवा पोटाचे दुखणे अचानक थांबले म्हणजे मुतखडा लघवीवाटे बाहेर पडून पडला असावा असे समजणे चुकीचे आहे.
मूत्रपिंडातील खडे जोपर्यंत किडनीमध्ये स्थिर असतात, तोपर्यंत ते सहसा तीव्र वेदना देत नाहीत. परंतु, जेव्हा खडा मूत्रवाहिनीमध्ये प्रवेश करतो, तेव्हा अडथळा निर्माण होतो.
खडा पुढे ढकलण्याच्या प्रयत्नात मूत्रवाहिनीचे स्नायू आकुंचन पावतात, ज्यामुळे पाठीत किंवा बाजूला तीव्र वेदनांच्या लाटा येतात.
जर खडा थोडा सरकला आणि मूत्राचा मार्ग तात्पुरता सुरळीत झाला, तर पाठीतील किंवा पोटातील वेदना कमी होऊ शकतात. परंतु, याचा अर्थ असा नाही की स्टोन नष्ट झाला आहे; तो अजूनही तिथेच किंवा वाटेत अडकला असू शकतो.
कमी वेदना किंवा वेदना पूर्णपणे थांबणे याचा अर्थ कधीही असा होत नाही की अडथळा नाहीसा झाला आहे. लक्षणे तीव्र नसली तरीही, खड्यामुळे लघवीच्या प्रवाहात असणारा सततचा सूक्ष्म अडथळा मूत्रपिंडावर दाब वाढवतो आणि मूत्रपिंडाचे कायमचे नुकसान करू शकतो.
योग्य जीवनशैली आणि काही सवयी अंगीकारल्यास किडनी स्टोनचा धोका टाळता येऊ शकतो:
दररोज किमान ८ ते १० ग्लास पाणी प्यावे, जेणेकरून लघवी पातळ राहील आणि खनिजे गोठणार नाहीत.
आहारामध्ये ऑक्सलेटयुक्त पदार्थांचे अतिसेवन टाळावे. मीठाचे प्रमाण कमी ठेवावे.