Raghav-Parineeti Destination Wedding In Rajasthan  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Raghav-Parineeti Destination Wedding: राघव- परिणीतीला लगीनघाई, कुटुंबीयांसोबत गाठलं राजस्थान...

Raghav-Parineeti Spotted Rajasthan: बहिण प्रियंकानंतर परिणीतीदेखील राजस्थानच्या उदयपूर किंवा जयपूरमध्ये लग्न करण्याची शक्यता आहे.

Chetan Bodke

Raghav-Parineeti Destination Wedding In Rajasthan: बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आपचे खासदार राघव चड्ढा यांची जोडी कमालीची चर्चेत आहे. एंगेजमेंट होण्यापूर्वीच चर्चेत राहिलेलं हे नाव सध्या रोजच कुठल्या ना कुठल्या कारणामुळे चर्चेत आहे. नुकतेच १३ मे रोजी या जोडीचा साखरपुडा झाल्यानंतर त्यांच्या लग्नाच्या चर्चांना आता उधाण आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही जोडी राजस्थानमध्ये लग्नगाठ बांधण्याची शक्यता आहे. बहिण प्रियंकाने जोधपूरमधील उमेद भवन पॅलेसमध्ये लग्नगाठ बांधली होती. आता अशातच मिळालेल्या माहितीनुसार, परिणीतीदेखील राजस्थानच्या उदयपूर किंवा जयपूरमध्ये लग्न करण्याची शक्यता आहे, अशी सध्या चर्चा सुरू आहे.

शनिवारी सकाळी ९:३० वाजता परिणीती उदयपूरमध्ये पोहोचल्यानंतर उदयपूरच्या लीला पॅलेसमध्ये थांबली होती. तसेच तिचे कुटुंबीय उदयविलास हॉटेलमध्ये थांबले होते. शनिवारी सकाळी परिणीतीने उदयविलास येथे नातेवाईकांसोबत जेवण केले. यानंतर ती हॉटेल लीला पॅलेसकडे रवाना झाली. बहिणीप्रमाणेच परिणीती देखील तिथेच लग्नगाठ बांधण्याची शक्यता सध्या वर्तवली जात आहे.

यावेळी, परिणीती चोप्राने पर्यटन विभागाच्या उपसंचालक शिखा सक्सेना यांची भेट घेऊन उदयपूरच्या पर्यटन स्थळांची आणि हॉटेलची माहिती जाणून घेतली. मिळालेल्या माहितीनुसार, आपचे खासदार राघव चड्ढा हे आधी उदयपूरला जाण्याचा विचार करत होते, पण ते आता जयपूरला जाऊन तिथल्या पर्यटन स्थळांची आणि हॉटेलची माहिती जाणून घेतील. तर परिणीती रविवारपर्यंत उदयपूरमध्ये राहणार असल्याची माहिती सध्या मिळत आहे. त्यानंतर ती जयपूरलाही जाणार आहे.

परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांनी त्यांच्या एंगेजमेंटसाठी फार कमी लोकांना आमंत्रित केले होते. त्यांच्या साखरपुड्याची सुरूवात 'अरदास' (प्रार्थनेने) झाली. या सोहळ्याला परिणीती आणि राघवचे कुटुंबीय तसेच त्यांचे जवळचे मित्र उपस्थित होते. अरदासनंतर लगेचच एंगेजमेंट सोहळा आटोपला आणि दोघांनीही एकमेकांना अंगठी घातली.

राघव- परिणीतीच्या नात्यातील एका जवळच्या व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार, दोघेही लग्नासाठी जास्त घाई करणार नसल्याची मिळत आहे. दोघांनाही कोणतीच लग्नाची घाई नसून सध्या ते आपल्या कामांमध्ये व्यग्र आहेत. लग्नाच्या पुर्वी ही जोडी कामाचे कमिटमेंट्स पूर्ण करण्यात व्यस्त आहेत. लग्नापेक्षा कामाला महत्वाचे आहे. सर्व कामं आटोपूनच ते लग्नबंधनात अडकणार असल्याची माहिती मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT