Justin Bieber
Justin Bieber Saam Tv
मनोरंजन बातम्या

पॉप स्टार Justin Bieber ला चेहऱ्यावर पॅरालिसिस अटॅक; Video शेअर करत म्हणाला, माझ्यासाठी...

Sanika

Justin Bieber Facial Paralysis: हॉलीवूडचा प्रसिद्ध पॉप गायक जस्टिन बीबर खूप लोकप्रिय आहे. जगाच्या कानाकोपऱ्यात त्याचे चाहते आहेत. त्याच्या गाण्यांची आणि कॅन्सर्टची चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. नुकतेच जस्टिन बीबरने (Justin Bieber) त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर (Instagram) स्वतःशी संबंधित एक धक्कादायक माहिती दिली आहे. जस्टिनने इंस्टाग्रामवर लिहिले की त्याला (Ramsay Hunt Syndrome) निदान झाले आहे ज्यामुळे चेहऱ्याचा पक्षाघात (Facial Paralysis) झाला आहे. त्याने नुकतेच स्वतःबद्दल जाहीर केले की आजारपणामुळे तो त्याच्या 'जस्टिस वर्ल्ड टूर शेड्यूल'मध्ये पुढे जाऊ शकणार नाही.

जस्टिन बीबरला Facial Paralysis;

जस्टिनने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो म्हणतो आहे की, 'तुम्ही बघू शकता, मी माझे डोळे बंद करू शकत नाही, मी माझ्या चेहऱ्याच्या या बाजूला हसू शकत नाही, माझे नाक हालत नाही' .' आपल्या वर्ल्ड टूरबद्दल सांगताना तो म्हणाला. 'माझ्या चेहऱ्याच्या या बाजूला पूर्ण अर्धांगवायू आहे. त्यामुळे माझा पुढचा शो रद्द झाल्याने नाराज आणि निराश आहे, टूरसाठी मी शारीरिकदृष्ट्या सक्षम नाही. हा एक गंभीर रोग आहे, जो आपल्याला दिसतोय. जस्टिन बीबरने त्याच्या पोस्टला कॅप्शन दिले, 'महत्वाचे आहे हे. मी तुमच्यावर खूप प्रेम करतो आणि माझ्यासाठी प्रार्थना करा.

जस्टिन बीबरचे काही चाहते त्याचा आगामी शो रद्द झाल्याने खूप नाराज झाले. याबद्दल बोलताना जस्टिनने सांगितले की, तो सध्या स्टेजवर फिजिकली परफॉर्म करू शकत नाही. डॉक्टरांनी त्यांना विश्रांती घेण्यास सांगितले आहे. याविषयी त्याने व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, 'ही गोष्ट खूपच गंभीर आहे, तुम्ही बघू शकता. माझी इच्छा आहे तसे असे झाले नाही, परंतु माझं शरीर विश्रांती मागत आहे. मला वाटते की मी थोडे शांत व्हावे. मला आशा आहे की तुम्ही लोक समजून घ्याल आणि मी हा वेळ विश्रांतीसाठी आणि आराम करण्यासाठी काढणार आहे. जेणेकरून मी 100 टक्के बरा होऊन पुन्हा परत होऊ शकेन.

पाहा व्हिडीओ-

रामसे हंट सिंड्रोम काय आहे?

रामसे हंट सिंड्रोम किंवा RHS हा एक दुर्मिळ न्यूरोलॉजिकल रोग आहे. यामध्ये कानाभोवती, चेहऱ्यावर किंवा तोंडावर वेदनादायक पुरळ येतात. याशिवाय रुग्णाच्या चेहऱ्यावर अर्धांगवायूही होऊ शकतो. यामुळे कानात बहिरेपणाची गंभीर समस्याही उद्भवू शकते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : सातारा जिल्ह्याचं स्वातंत्र्यलढ्यात मोठं योगदान, शरद पवार

Maharashtra Politics: विधानसभेत काँग्रेस- ठाकरे गट वेगळे लढणार, प्रकाश आंबेडकर यांचं भाकीत

Maharashtra Politics 2024 : ...तर आम्ही मदत केली असती; हिना गावित यांच्या भेटनंतरही शिवसेनेच्या संपर्कप्रमुखांची नाराजी कायम

धडाधड त्यांचे उमेदवार पाडा, राजू शेट्टींचे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आवाहन, Video

Fastest Fifty in 2024 : १५ चेंडूंतच ठोकलं अर्धशतक, फ्रेजर मॅक्गर्कनं स्वतःचाच रेकॉर्ड मोडला, बुमराहलाही सोडलं नाही!

SCROLL FOR NEXT