Pankaj Jha Criticized Pankaj Tripathi Saam Tv
मनोरंजन बातम्या

Panchayat Vidhayak ji Pankaj Jha: "पाठीमागून राजकारण खेळणाऱ्यांची मला पर्वा नाही...", पंकज झा पंकज त्रिपाठीसह अनुराग कश्यपवर भडकले

Pankaj Jha Interview : 'पंचायत ३' मधील आमदाराचे पात्र साकारलेल्या पंकज झा यांनी बॉलिवूड अभिनेते पंकज त्रिपाठीवर प्रचंड टिका केली होती. त्यांच्या अभिनयावरूनही त्यांना ट्रोल केले होते.

Chetan Bodke

गेल्या काही दिवसांपूर्वी 'पंचायत ३' मधील आमदाराचे पात्र साकारलेल्या पंकज झा यांनी बॉलिवूड अभिनेते पंकज त्रिपाठीवर प्रचंड टिका केली होती. त्यांच्या अभिनयावरूनही त्यांना ट्रोल केले होते. अशातच आता पंकज झा यांनी अभिनेते पंकज त्रिपाठी यांच्यासह दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्यावर टीका केलेली आहे.

गँग्स ऑफ वासेपूरमधील सुलतानच्या भूमिकेसाठी सर्वात आधी पंकज झा यांना विचारण्यात आले होते. पण ती भूमिका पंकज त्रिपाठी यांना देण्यात आला असा दावा पंकज झा यांनी मुलाखतीत केला होता. पंकज झा यांनी डिजिटल कॉमेंट्रीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, "माझ्या पाठीमागून राजकारण खेळणाऱ्यांची मला पर्वा नाही. पाठी मागून राजकारण खेळणारा जिंकतो, पण यामध्ये समोरच्याचे नुकसान होते. पाठीमागून राजकारण खेळणारे लोकं सहसा भित्रे असतात. बरोबर? जर का ते भित्रे नसते, तर ते पुढे येऊन त्यांनी माझ्यावर टीका टिप्पणी केली असती."

पंकज झा यांनी दिग्दर्शक अनुराग कश्यपवर टीका केली की, " 'सत्या' आणि 'गुलाल' सारखे चित्रपट कलाकार बनवू शकतात तसेच उत्तम दिग्दर्शकही तयार करू शकतात. पण इथे असे अनेक लोकं आहेत, त्यांना आपले मत मांडता येत नाही. नंतर मला कळलं की, दिग्दर्शकाचीच इथे अवस्था वाईट होती. ते स्वत: कोणतेही कामं मिळत नसल्यामुळे एकाच प्रोजेक्टवर काम करत होते." पंकज झा यांनी अनुराग कश्यपसोबत 'गुलाल' आणि 'ब्लॅक फ्रायडे' चित्रपटात काम केले आहे. 'गँग्स ऑफ वासेपूर'नंतर अनुराग कश्यपसोबतचे नाते वाईट झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT