Payad Marathi Movie Saam Tv
मनोरंजन बातम्या

Palyad: 'पल्याड'चा आंतरराष्ट्रीय पातळीवर डंका; फोर्ब्स मासिकेने घेतली दिग्दर्शकांची मुलाखत

'पल्याड' चित्रपटाची दखल आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या 'फोर्ब्स' मासिकाने घेतली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: अनेक मराठी चित्रपटांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर आपले निर्विवाद (Marathi Movie) वर्चस्व कायम ठेवले आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक चित्रपटांचा मराठी भाषेचा झेंडा मोठ्या डौलात फडकवत आहे. अनेक विविध चित्रपट महोत्सवात अगदी डौलाने 'पल्याड' (Palyad) चित्रपटाने कौतुकाला पात्र ठरणाऱ्या अनेक पुरस्कारांवर आपले नाव उमटवले आहे. 'पल्याड' या चित्रपटाने आपल्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

'पल्याड' चित्रपटाची दखल आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या 'फोर्ब्स' मासिकाने (International FORBES Magazine) घेतली आहे.चित्रपटाचा डंका राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर जोरात आहे. चित्रपटाने आपल्या प्रेक्षकांसोबत चित्रपटसृष्टीचेही लक्ष वेधले आहे.

'फोर्ब्स' सारख्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील अग्रगण्य मासिकात मराठमोळ्या दिग्दर्शकाची मुलाखत प्रकाशित होणे ही प्रत्येक मराठी माणसासाठी अभिमानाची आणि कौतुकास्पद बाब आहे. एका महत्त्वपूर्ण विषयावर प्रकाशझोत टाकणाऱ्या 'पल्याड' या चित्रपटाची दखल 'फोर्ब्स'ने घेत संपूर्ण टिमवर यशाचा वर्षाव केला जात आहे.

शैलेश दुपारे यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाची निर्मिती व्हिजनरी व्यावसायिक व निर्माते पवन सादमवार, सुरज सादमवार, मंगेश दुपारे, प्रणोती पांचाळ आणि शैलेश भीमराव दुपारे यांनी एलिवेट फिल्म्स व एलिवेट लाईफ आणि लावण्य प्रिया आर्टसच्या बॅनरखाली केली आहे. 4 नोव्हेंबर रोजी 'पल्याड' हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची कथा स्मशानजोगी समाजातील परिवाराभोवती चित्रित करण्यात आली आहे.

दिग्दर्शक चित्रपटाविषयी म्हणतात, 'फोर्ब्स' हे जागतिक पातळीवरील प्रसिद्ध मासिक आहे. यात स्वत:चे नाव पहाण्याचे स्वप्न जगातील अनेक व्यावसायिक पाहतात. जागतिक पातळीवर विक्रमी कामगिरी करणाऱ्या व्यक्तींची नावे या मासिकात पहायला मिळतात. यांच्या पंक्तीत विराजमान होण्याचा मान 'पल्याड'सारख्या मराठी चित्रपटाला मिळणे ही जगभरातील मराठी भाषिकांसाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. हे सर्व श्रेय 'पल्याड'च्या संपूर्ण टिमला जाते. समाजातील विविध स्तरांतून प्रदर्शनापूर्वीच 'पल्याड'चे होणारे कौतुक पाहून उर अभिमानाने भरुन आले आहे.'

समाजातील रूढ जाचक चालीरीती, परंपरा, रितीरिवाज, प्रथा यांच्यावर भाष्य करणाऱ्या या चित्रपटात आजच्या काळातील महाराष्ट्रातील वास्तव दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या विषयाची दाहकता राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरील सिने महोत्सवांमधील परीक्षकांनाही भावल्याने या चित्रपटाने विविध पुरस्कारावर आपले नाव कोरले आहे. प्रदर्शनाआधीच चित्रपटाने रसिकांच्या मनात उत्सुकता जागवली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Toilet Paper : टॉयलेट पेपरचा अतिवापर पडेल महागात, होऊ शकतात 'हे' ५ गंभीर आजार

Maharashtra News Live Update: राज ठाकरे यांची २७ तारखेला कर्जतमध्ये सभा

Volvo EX90: एका सेकंदात १०० किमीचा स्पीड, एका चार्जमध्ये ७२५ किमीची रेंज; Volvoची दमदार कार लॉन्च

8th Pay Commission : मुंबईतील बैठक संपली; बेसिक सॅलरीमध्ये DA मर्ज होणार का? वाचा अपडेट्स

How to Peel Garlic: आता काही सेकंदात सोलून होईल लसूण; फक्त फॉलो करा या 3 टीप्स

SCROLL FOR NEXT