Mahira Khan Deleted Post : पाकिस्तानी अभिनेत्री महिरा खानने जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यावर सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिली होती. तिने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर लिहिले होते, "दुनियेत कुठेही, कोणत्याही स्वरूपातील हिंसा ही केवळ कायरतेचे लक्षण आहे. पहलगाम हल्ल्यात दगावलेल्यांनसाठी मी प्रार्थना करते." मात्र, काही तासांनंतर तिने ही पोस्ट हटवली, ज्यामुळे सोशल मीडियावर चर्चेला उधाण आले.
महिरा खानने 24 एप्रिल रोजी रात्री 9 वाजता ही पोस्ट शेअर केली होती. या हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला होता आणि 10 हून अधिक जखमी झाले होते. पहलगाम येथील झालेल्या या हल्ल्यात अधिकतर लोक पर्यटक होते, ज्यांना त्यांच्या धर्माची विचारणा करून गोळ्या घालण्यात आल्या.
महिरा खानच्या या पोस्टनंतर, पाकिस्तानी अभिनेता फवाद खान आणि हानिया आमिर यांनीही हल्ल्याचा निषेध करत सोशल मीडियावर आपली प्रतिक्रिया दिली. फवाद खानने लिहिले, "पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्याच्या बातमीने खूप दुःख झाले. या भयावह घटनेतील पीडितांसाठी आमच्या संवेदना आणि प्रार्थना आहेत." हानिया आमिरने लिहिले, "कोठेही घडणारी शोकांतिका आपल्यासाठीही शोकांतिका आहे. मला या अलीकडील घडलेल्या घटनांमुळे खूप दुःख झाले आहे."
महिरा खानने तिची पोस्ट का हटवली, याचे कारण स्पष्ट झालेले नाही. मात्र, तिच्या या कृतीमुळे सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटल्या आहेत. काहींनी तिच्या धैर्याचे कौतुक केले आहे, तर काहींनी तिच्या पोस्ट हटवण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या घटनेमुळे कलाकारांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याबाबत नव्याने चर्चा सुरू झाली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.